Sugar Export: यंदा देशात विक्रमी साखर उत्पादनाचा अंदाज; किती टन निर्यात होणार ते ठरले

निर्यातीचा दुसरा कोटाही मेअखेर जाहीर होण्याचा अंदाज
Sugar Export
Sugar ExportDainik Gomantak
Published on
Updated on

Sugar Export: भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. तर साखर निर्यातीच्याबाबत भारत जगात ब्राझिलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा देशात विक्रमी साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे साखर उद्योगाला वाटत होते की, किमान 80 ते 90 लाख टन साखरेच्या निर्यातीस केंद्र सरकार मंजुरी देईल, पण केंद्राने 60 लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे.

Sugar Export
Assembly ByPoll Results: विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा; निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या

केंद्राने 2022-23 या वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा 60 लाख टन केला आहे कारण जगात सर्वत्र महागाई आणि अनिश्चित्ततेचे वातावरण आहे. त्यामुळे पुढच्या वर्षभरात महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापेक्षा जास्त साखर निर्यात करणे भारताला शक्य आहे, पण भविष्यातील अनिश्चित्ततेमुळे सरकारने सावध पावले टाकली आहेत.

निर्यातीचा हा कोटा खरेतर गतवर्षीपेक्षा कमीच आहे. पण देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गत आर्थिक वर्षात साखर निर्यात कोटा 1.10 कोटी टन इतका होता. म्हणजे, यंदा गतवर्षीच्या तुलनेत निम्माच निर्यात कोटा आहे. साखरेचे वित्तवर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे असते.

Sugar Export
Gujarat Election 2022: यंदाच्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून टाका! पंतप्रधान मोदींचे आवाहन

दरम्यान, साखरेचे उत्पादन पाहून सरकार निर्यातीचा दुसरा कोटाही नंतर जारी करू शकते. तो साधारण 20 ते 30 लाख टन असू शकतो. शिवाय साखरेचे विक्रमी उत्पादन यंदा होणार असल्याने दुसऱ्यांदा निर्यात कोटा जाहीर करावा लागेल, असा विश्वास साखर उद्योगालाही वाटतो आहे. मे पर्यंत 60 लाख टन साखर निर्यात झाली की मेअखेरपर्यंत सरकार दुसरा कोटा निश्चित्त करू शके. देशात यंदा 3.65 कोटी टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

यापुर्वी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची किंमत पाहून १ जून २०२२ पासून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले होते. साखरेच्या विक्रमी निर्यातीनंतर साखरेच्या दरात वाढ झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com