Renuka Chowdhury: 'चावणारे तर संसदेत बसलेत...' काँग्रेस खासदार रेणुका चौधरींची पाळीव कुत्र्यासोबत एन्ट्री Watch Video

Renuka Chowdhury Pet Controversy: रेणुका चौधरी यांनी कुत्र्याला घेऊन संसद भवनात प्रवेश केल्याने टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.
Renuka Chowdhury Pet Controversy
Renuka Chowdhury Dainik Gomantak
Published on
Updated on

Renuka Chowdhury Pet Controversy: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वायू प्रदूषणासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधी पक्षांनी जोरदार गदारोळ केला. याच गदारोळात काँग्रेसच्या (Congress) खासदार रेणुका चौधरी यांनी आपल्या कारमध्ये एका कुत्र्याला घेऊन संसद भवन परिसरामध्ये प्रवेश केल्याने मोठा वाद निर्माण झाला.

कारमध्ये कुत्र्याला आणल्याने वाद

रेणुका चौधरी यांनी कुत्र्याला घेऊन संसद (Parliament) भवनात प्रवेश केल्याने टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. संसद भवनात कुत्र्याला आणल्याच्या वादावर रेणुका चौधरी म्हणाल्या, "यासाठी कोणता कायदा आहे का? मी जात असताना एका स्कूटरची एका कारला धडक बसली. त्याचवेळी एक लहान पपी (कुत्रा) रस्त्यावर फिरत होता. मला वाटले की त्याला धडक बसेल. म्हणून मी त्याला कारमध्ये घेऊन संसदेत आले. त्यानंतर लगेच कुत्र्याला घरीही पाठवून दिले. मग या चर्चांचा अर्थ काय?"

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, तो पपी कारमध्येच होता आणि कार संसदेत आली. याला विनाकारण मुद्दा बनवू नये. त्या एका निराधाराची काळजी घेत होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे.

Renuka Chowdhury Pet Controversy
Parliament Session: संसदेत पहिल्यांदाच बोलले दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो, ज्वलंत मुद्यावर सरकारला धरले धारेवर

रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा

याच विषयावरुन रेणुका चौधरी यांनी थेट सरकारवर निशाणा साधला. सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, "खरे तर चावणारे संसदेत बसलेले आहेत. ते सरकार चालवतात. आम्ही एका मुक्या जनावराची काळजी घेतली. मात्र हा मोठा चर्चेचा विषय बनला. सरकारकडे दुसरे काही काम नाही का?" "मी त्या कुत्र्याला घरी पाठवले आणि सांगितले की, त्याला घरीच ठेवा. जे लोक संसदेत बसून रोज आम्हाला त्रास देतात त्यांच्याबद्दल आपण बोलत नाही," अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

विरोधकांना पंतप्रधान मोदींचा सल्ला

दुसरीकडे, हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना नाटकीयता न करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान म्हणाले की, ''देशाच्या प्रगतीसाठी हिवाळी अधिवेशन महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपले मुद्दे सभागृहात योग्यरित्या मांडूयात.'' "विरोधी पक्षांनी आपले दायित्व निभवावे. योग्य मुद्दे उपस्थित करावेत. तसेच पराजयाच्या निराशेमधून बाहेर यावे," असा सल्लाही त्यांनी पुढे बोलताना दिला.

Renuka Chowdhury Pet Controversy
PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

ते शेवटी म्हणाले की, हे सत्र राष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याच्या प्रयत्नांना ऊर्जा देण्याचे काम करेल. मात्र हरल्याचा राग काढण्याचे हे सत्र माध्यम बनता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी दिलेल्या सल्ल्यानंतरही पहिल्याच दिवशी संसदेत जोरदार गदारोळाने झाल्याने अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com