Bangalore Stampede
Bangalore StampedeDainik Gomantak

Bangalore Stampede: विराट-अनुष्काला धक्का, विमानतळावरच केली अटक; बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

RCB Marketing Head Arrested: आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यापूर्वीच बेंगळुरू पोलिसांनी त्यांना अटक केली.
Published on

Bangalore Stampede

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्यापूर्वीच बेंगळुरू पोलिसांनी त्यांना अटक केली.

पोलिसांनी निखिल यांना बंगळुरू विमानतळावरून अटक केली. याशिवाय, पोलिसांनी विजय परेडचे आयोजक डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या तीन कर्मचाऱ्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

निखिल सोसाळे हे संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जवळचे मानले जातात. सोसाळेबद्दल बोलायचे झाले तर, २०२५ च्या हंगामात तो आरसीबीच्या प्रत्येक आयपीएल सामन्यात दिसला होता. अनेक वेळा तो विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासोबत स्टँडमध्ये बसलेला दिसला. सोसाळे सुरुवातीच्या काळापासून फ्रँचायझीशी संबंधित आहे.

Bangalore Stampede
Goa Politics: दामू नाईक - संतोष यांची विमानतळावर भेट! रात्री उशिरापर्यंत खलबते; राजकीय वर्तुळात खमंग चर्चा

गुरूवारी (१४ जून) संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

कारवाई करत मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांसह ८ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. कालच कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि कोषाध्यक्ष फरार झाले होते.

Bangalore Stampede
Goa Beach Shack: खुशखबर! जूनमध्ये वाढले पर्यटक, बीच शॅक्सना मुदतवाढ द्या; व्यावसायिकांकडून होतेय मागणी

अपघाताचे कारण

मोफत पाससह स्टेडियममध्ये प्रवेश करणे हे देखील अपघाताचे एक प्रमुख कारण आहे. प्रेक्षकांना आरसीबीच्या वेबसाइटवरून पास मिळवावे लागले. बुधवारी जेव्हा हे जाहीर करण्यात आले तेव्हा वेबसाइट क्रॅश झाली. लोक पासशिवायही स्टेडियममध्ये पोहोचले. त्यामुळे गर्दीचा अंदाज येत नव्हता.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की गर्दी नियंत्रणाबाहेर होती, व्यवस्था अपुरी होती. १ किलोमीटरच्या परिघात ५० हजार लोक जमले होते. अनेक लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्याने सांगितले की आम्हाला काही ठिकाणी लाठीमार करावा लागला. स्टेडियमचे दरवाजे अरुंद होते आणि गर्दीमुळे ही दुर्घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com