Indian Army: चन्निरा बन्सी पोनप्पा बनले डेप्यूटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ

लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा (Lt Gen C Bansi Ponnappa) यांनी बुधवारी भारतीय लष्कराचे उप-सेनाप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Lt Gen C Bansi Ponnappa
Lt Gen C Bansi PonnappaDainik Gomantak
Published on
Updated on

लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा (Lt Gen C Bansi Ponnappa) यांनी बुधवारी भारतीय लष्कराचे उप-सेनाप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्याच वेळी, नौदलाचे माजी उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार यांनीही राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात पहिल्या राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयकाची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतीय लष्कराने (Indian Army) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करुन ही माहिती दिली. लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा यांच्याकडे प्रतिष्ठित वज्र सेनेचे नेतृत्व करण्याचा मान आहे. (Lt Gen C Bansi Ponnappa Becomes Deputy Chief Of Army Staff)

कोण आहेत व्हाईस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार?

व्हाइस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार 1 जुलै 1982 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत रुजू झाले. ते अमरावती नगरमधील सैनिक स्कूल आणि पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. व्हाइस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार (Vice Admiral G. Ashok Kumar) 1989 मध्ये कोचीमध्ये शिपिंग आणि ऑपरेशन्सचे प्रमुख झाले. त्यानंतर ते भारतीय नौदलाच्या बियास, निलगिरी, रणवीर आणि विक्रांत या जहाजांमध्ये शिपिंग अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यांनी 30 जानेवारी 2019 रोजी भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय नौदलात 39 वर्षे विविध पदांवरुन सेवा केल्यानंतर 31 जुलै 2021 रोजी ते निवृत्त झाले होते.

Lt Gen C Bansi Ponnappa
Indian Army Day: 'या' बॉलीवुड चित्रपटांमध्ये भारतीय सैन्यांचे दाखवण्यात आले शौर्य

लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा यांच्या नावावर अनेक विक्रम

लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा कर्नाटकातील विराजपेट तालुक्यातील बिट्टंगलाजवळील नांगला गावचे आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव नित्या मेडप्पा आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा निशांत भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी म्हणून तैनात आहे तर मुलगी सुनैना सध्या शिक्षण घेत आहे.

लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा यांनी आपल्या सेवेत अनेक विक्रम केले आहेत. त्यांनी ब्राझीलमध्ये लेफ्टनंट जनरल कार्लोस अल्बर्टो दास सॅंटोस क्रूझ यांच्यासोबतही काम केले आहे. भारताचे लेफ्टनंट जनरल प्रकाश यांच्यानंतर मार्च 2013 मध्ये त्यांना MONUSCO च्या फोर्सचे कमांडर बनवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com