Rashid Khan: करामती राशिदचा मोठा 'कारनामा'! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा आशियाई कर्णधार; नेतृत्वासह गोलंदाजीतही चमकला

Rashid Khan Record: अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खान याने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे.
Rashid Khan Record
Rashid KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Rashid Khan Record: अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खान याने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनून त्याने विक्रम रचला. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज टिम साउदी याला मागे टाकत राशिदने हे यश मिळवले. आता त्याच्या नावावर 165 बळींची नोंद झाली. याआधी, हा जागतिक विक्रम टिम साउदीच्या नावावर होता, ज्याने 126 सामन्यांच्या 123 डावांमध्ये 164 विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे, राशिदने ही किमया अवघ्या 98 सामन्यांमध्येच साधली.

शानदार कामगिरी

दरम्यान, 26 वर्षीय राशिदने शारजाहमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आपल्या 4 षटकांत केवळ 21 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळेच त्याला हा टप्पा गाठता आला. त्याच्या या कामगिरीने अफगाणिस्तानला सामन्यात वर्चस्व मिळवण्यात मदत झाली.

टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:

  • राशिद खान - 165 बळी (98 सामने)

  • टिम साउदी - 164 बळी (126 सामने)

  • ईश सोढी - 150 बळी (117 सामने)

  • शाकिब अल हसन - 149 बळी (121 सामने)

  • मुस्तफिजुर रहमान - 142 बळी (100 सामने)

Rashid Khan Record
Rashid Khan Video: करामती खानची रेकॉर्डब्रेक Hat-Trick! 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

कर्णधार म्हणूनही नवा विक्रम

टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्यासोबतच, राशिद खानने (Rashid Khan) कर्णधार म्हणूनही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेणारा तो जगातील पाचवा कर्णधार बनला. याआधी केवळ चार कर्णधारांनीच हा विक्रम केला होता. कुवैतचा मोहम्मद असलम (76 बळी), रवांडाचा क्लिंटन रुबागुम्या (58 बळी), नामिबियाचा गेरहार्ड इरास्मस (54 बळी) आणि जर्सीचा चार्ल्स पर्चर्ड (83 बळी) यांचा या यादीत समावेश आहे. आशियाई कर्णधारांमध्ये तो मोहम्मद असलम नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टी20 इंटरनॅशनलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:

  • चार्ल्स पर्चर्ड (जर्सी) - 83 बळी

  • मोहम्मद असलम (कुवैत) - 76 बळी

  • क्लिंटन रुबागुम्या (रवांडा) - 58 बळी

  • गेरहार्ड इरास्मस (नामिबिया) - 54 बळी

  • राशिद खान (अफगाणिस्तान) - 52 बळी

सर्वांत कमी वयात मोठा विक्रम

केवळ 26 वर्षांच्या वयात राशिदने हे जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत, ज्यामुळे त्याचे स्थान क्रिकेटच्या इतिहासात अधिक मजबूत झाले आहे. तो केवळ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येच नाही, तर जगभरातील सर्व टी20 लीगमध्येही सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावावर आतापर्यंत 664 टी20 विकेट्स आहेत, जो टी20 क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्सचा जागतिक विक्रम आहे.

Rashid Khan Record
IND vs AFG: अफगाणिस्तानला मोठा झटका, भारताविरुद्धच्या T20 मालिकेला राशिद खान मुकणार

राशिदच्या फिरकीचा सामना करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नाही. त्याची अचूक लाईन-लेंग्थ, वैविध्यपूर्ण गुगली आणि वेगात बदल करण्याची क्षमता त्याला विशेष बनवते. अफगाणिस्तानसारख्या (Afghanistan) देशातून येऊन इतक्या कमी वयात जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. येत्या काही वर्षांत तो 1000 विकेट्सचा आकडाही पार करु शकतो, अशी आशा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. राशिद खानची ही कामगिरी केवळ वैयक्तिक विक्रम नसून, अफगाण क्रिकेटसाठी एक मोठा सन्मान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com