मोठ्या बहिणीला बरं करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने लहान बहिणीचं केलं लैंगिक शोषण

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
Chhattisgarh Crime
Chhattisgarh CrimeDainik Gomanmtak
Published on
Updated on

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मोठ्या बहिणीवर उपचार करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

तिने कोणाला काही सांगितले तर जादूटोणा करुन तिच्या भावाला आणि वडिलांना मारुन टाकू, अशी धमकीही आरोपीने दिली. या भीतीपोटी ही तरुणी दोन वर्षे लैंगिक शोषणाची शिकार राहिली.

दरम्यान, शहरापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिपत पोलिस (Police) स्टेशन परिसरात ही घटना घडली. जिथे मांत्रिकाने मोठ्या बहिणीवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्या लहान बहिणीला दोन वर्षे आपल्या वासनेची शिकार बनवले.

पीडितेने सांगितले की, 2021 मध्ये तिच्या 25 वर्षांच्या मोठ्या बहिणीची तब्येत बिघडली होती. जिच्या उपचारासाठी परिसरात राहणाऱ्या बैगा म्हणजेच मांत्रिकाला घरी बोलावण्यात आले होते.

आरोपी मांत्रिक नंदकुमार सिंह (50) याने उपचाराच्या नावाखाली संपूर्ण कुटुंबाचा विश्वासात केला आणि घाणेरडे काम करत राहिला.

Chhattisgarh Crime
Chhattisgarh: अनुकंपा नियुक्तीसाठी आई-वडिल आणि आजीची हत्या; सॅनिटायझर टाकून जाळले मृतदेह

उपचाराच्या बहाण्याने पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार

पीडितेने सांगितले की, 'उपचारासाठी तो घरी येत होता. याचदरम्यान त्याची नियत बिघडली. त्याने दोन वर्षे शोषण केले.' यापुढे जावून त्याने तिला याबाबत कोणाला काही सांगितले तर जादूटोणा करुन तिच्या भावाला आणि वडिलांना मारुन टाकू, अशी धमकीही दिली.

मांत्रिकाच्या या कृत्याने व्यथित झालेल्या पीडितेने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकमताने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Chhattisgarh Crime
Chhattisgarh: छत्तीसगडमध्‍ये नक्षलाची दहशत, दंतेवाडामध्‍ये बस पेटवली

पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली

या संपूर्ण प्रकरणावर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, एक मांत्रिक मुलीला धमकावून वर्षानुवर्षे बलात्कार करत होता. पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला (Accused) अटक करुन कारागृहात पाठवण्यात आले आहे. पीडितेचे समुपदेशन केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com