Delhi Car Blast: दिल्ली कार स्फोट प्रकरण; 'क्रिकेट टीम' थोडक्यात बचावली, बस 40 मिनिटे आधी निघाल्याने टळला मोठा अनर्थ!

Ranji Cricketers Narrowly Escape: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
Ranji Cricketers Narrowly Escape
Delhi Car BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Cricketers Narrowly Escape: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 25 जण गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या स्फोटाने संपूर्ण दिल्ली हादरली. त्याचवेळी, या स्फोटाच्या घटनेतून दिल्ली आणि जम्मू-काश्मीर संघाचे रणजी क्रिकेटपटू थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

क्रिकेटपटू थोडक्यात बचावले

सोमवारी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली आणि जम्मू-काश्मीर यांच्यात रणजी ट्रॉफी 2025-26 चा सामना सुरु होता आणि त्या दिवसाचा खेळ संपला होता. लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. अनेक लोक या अपघाताला बळी पडले. ज्यावेळी हा स्फोट झाला त्याच्या अवघ्या 40 मिनिटांपूर्वीच दिल्ली आणि जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) या दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ अरुण जेटली स्टेडियममधून आपापल्या निवासस्थानाकडे निघाले होते. स्टेडियम आणि लाल किल्ल्याचे ठिकाण केवळ काही मिनिटांच्या अंतरावर असल्याने हा अपघात आणखी काही मिनिटांनी झाला असता तर दोन्ही संघातील खेळाडू आणि स्टार क्रिकेटपटूंसोबत मोठा अनर्थ घडला असता.

Ranji Cricketers Narrowly Escape
Delhi Red Fort Blast: "कट रचणाऱ्यांना सोडणार नाही..." दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींचा कठोर इशारा

चोख बंदोबस्तात सामना झाला

या स्फोटाच्या घटनेने संपूर्ण दिल्लीत भीतीचे वातावरण पसरले असले तरी, दिल्ली क्रिकेट असोसिएशन आणि सुरक्षा यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेतली. या मोठ्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर 11 नोव्हेंबर रोजी रणजी सामन्याच्या शेवटच्या दिवशी (चौथ्या दिवशी) स्टेडियमवर आणि खेळाडूंच्या निवासाजवळ सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला. भीतीचे वातावरण असतानाही दोन्ही संघांतील खेळाडूंनी सामना पूर्ण केला.

Ranji Cricketers Narrowly Escape
Delhi Blast: कारमधील प्रवाशांना 'स्फोटाची' कल्पना होती? चौकशी सुरू; भारत- नेपाळ सीमेवर सावधगिरीचा इशारा, बंदोबस्तात वाढ

जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक विजय

या कसोटी सामन्याचा निकालही ऐतिहासिक लागला. शेवटच्या दिवशी जम्मू-काश्मीरच्या संघाने दिल्लीवर मोठी मात करत विजय मिळवला. रणजी करंडक स्पर्धेच्या 96 वर्षांच्या इतिहासात जम्मू-काश्मीरने पहिल्यांदाच दिल्लीचा (Delhi) पराभव करुन ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात त्यांची चर्चा सुरु आहे. लाल किल्ल्याजवळच्या स्फोटासारख्या गंभीर घटनेतून खेळाडू थोडक्यात बचावल्याने प्रशासनाने खेळाडूंच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com