Delhi Red Fort Blast: "कट रचणाऱ्यांना सोडणार नाही..." दिल्ली बॉम्बस्फोटावर पंतप्रधान मोदींचा कठोर इशारा

PM Narendra Modi Delhi Red Fort Blast: दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. तसंच त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केलंय.
PM Narendra Modi Delhi Red Fort Blast
PM Narendra Modi Delhi Red Fort BlastDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला. तसंच त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केलंय. या घटनेमागील कट रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं. जबाबदार असलेल्या सर्वांना शिक्षा होईल, असा कठोर इशारा त्यांनी दिलाय.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यासाठी शेजारील भूतानला गेले आहेत. ११ नोव्हेंबर रोजी त्यांनी राजधानी थिंपू येथे जनतेला संबोधित केले. भूतान-भारत संबंधांवर बोलताना पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील कार बॉम्बस्फोटाचाही उल्लेख केला.

PM Narendra Modi Delhi Red Fort Blast
Goa ZP Election: 'भाजप' तिकिटासाठी भाऊगर्दी, पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली; 12 पेक्षा अधिक उमेदवारांचे गुडघ्‍याला बाशिंग

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज मी खूप दुःखी मनाने येथे (भूतानला) आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने सर्वांना खूप दुःख झाले आहे. मी पीडित कुटुंबांचे दुःख समजतो. आज संपूर्ण राष्ट्र त्यांच्यासोबत उभे आहे."

"मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व एजन्सींशी संपर्कात होतो. आमच्या एजन्सी या कटाच्या तळाशी जातील. यामागील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही. जबाबदार असलेल्या सर्वांना न्याय मिळवून दिला जाईल," असे ते म्हणाले.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की इतर वाहने आणि जवळील लोकांचे तुकडे झाले. आतापर्यंत या घटनेतील मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

PM Narendra Modi Delhi Red Fort Blast
Delhi Blast: 5 साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली 'दिल्ली', हायकोर्टाबाहेर रक्ताचे पाट; 2005 च्या स्फोटात 60 हून अधिकांचा मृत्यू VIDEO

दरम्यान, २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. लाल किल्ला मेट्रोच्या गेट क्रमांक १ जवळ एका संथ गतीने चालणाऱ्या कारमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com