Azam Khan: आझम खानला 7 वर्षांची शिक्षा, डुंगरपूर प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय

Dungarpur Case: डुंगरपूर प्रकरणात रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Azam Khan
Azam Khan Dainik Gomantak
Published on
Updated on

Azam Khan Sentence In Dungarpur Case: डुंगरपूर प्रकरणात रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. उर्वरित दोषींना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणात आझम खान यांना आयपीसी कलम 427, 504, 506, 447 आणि 120बी अंतर्गत दोषी घोषित केले. खान यांच्यासह नगरपालिकेचे माजी अध्यक्ष अझहर अहमद खान, कंत्राटदार बरकत अली, सेवानिवृत्त सीओ आले हसन हेही दोषी आढळले आहेत. आज न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. यादरम्यान सपा नेते आझम खान सीतापूर तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले होते.

दरम्यान, डुंगरपूरमध्ये सपा सरकारच्या काळात 'आसरा आवास' बांधण्यात आली होती. या ठिकाणी काही लोकांनी आधीच घरे बांधली होती. मात्र, सरकारी जमिनीवर अनधिकृतरित्या घरे बांधण्यात आल्याचे सांगत 2016 मध्ये ती पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात लूटपाट केल्याचाही आरोप पीडितांनी केला होता. 2019 मध्ये या प्रकरणी रामपूरच्या गंज पोलिस ठाण्यात सुमारे डझनभर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सपा सरकार असताना आझम खान यांच्या सांगण्यावरुन पोलीस आणि एसपींनी जबरदस्तीने आसरा आवास बांधण्यासाठी घरे पाडण्यात आली. तिथे आधीच बांधलेली घरे बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आली.

Azam Khan
Azam Khan: आझम खानसह पत्नी आणि मुलाला 7 वर्षांची शिक्षा, जन्म प्रमाणपत्र प्रकरणात मोठा झटका!

दुसरीकडे, डुंगरपूर प्रकरणातील एका केसमध्ये न्यायालयाने 31 जानेवारी 2024 रोजी निकाल दिला होता. न्यायालयाने आझम खान यांची निर्दोष मुक्तता केली होती. करामत अली हिच्या वतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय देताना आझम खानसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. आझम खान यांच्यावर 2019 मध्ये एकूण 84 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील बहुतांश प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 प्रकरणांमध्ये निकाल आला आहे. यापैकी तीन प्रकरणांत ते दोषी ठरले, तर दोन प्रकरणांमध्ये ते निर्दोष सुटले.

Azam Khan
Azam Khan Controversial Statement: 'मृतदेहाचा तुकडाही सापडला नाही...,' आझम खान यांचं राजीव गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य

आझम खान यांचे कुटुंबीय यूपीच्या वेगवेगळ्या तुरुंगात बंद आहे

आझम खान यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सपा नेते आझम खान, त्यांची पत्नी तनजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम हे यूपीच्या वेगवेगळ्या तुरुंगात बंद आहेत. आझम खान यांना सीतापूर तुरुंगात, मुलगा अब्दुल्ला आझम हरदोई तुरुंगात, तर पत्नी रामपूर तुरुंगात आहे. या तिघांनाही बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात रामपूर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com