Ram Mandir: प्रभू श्रीरामच्या मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा

उत्तर प्रदेशाच्या शिवसेनेच्या नेत्याची मागणी (Ram Mandir)
Ram Mandir, Planned Design
Ram Mandir, Planned DesignSiddhesh Shirsat / Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बाबरी मस्जिद (Babari Masjid ) कि राम मंदिर (Ram Mandir) या देशातील सर्वात मोठा मानला जाणारा खटल्याचा (Case) निर्णय राम मंदिराच्या बाजूने दिल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिर (Huge Ram Mandir) उभारणीसाठी भूमिपूजन (Bhumi Pujan) सुद्धा केले, अयोध्या होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त (Anniversay) एक विशेष महापुजा व इतर धार्मिक विधींचे आयोजन (Organizing events) करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम छोट्या स्वरूपात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडला जाणार असल्याचे बोलले जात आहे. सदर कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Aaditynath) उपस्थित होणार आहेत तसेच मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास उपस्थित होणार असल्याचे उत्तर प्रदेशच्या माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पण श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून (Shri Ram Janmbhumi Teerthkshetra trust ) याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

Ram Mandir, Planned Design
त्रिपुरात BSF चे दोन जवान शहीद; NLFT कडून झाला हल्ला

शेकडो वर्षानंतर संपूर्ण विश्वातील हिंदूंची आस्था (Hindu's faith) असलेले भव्य राम मंदिर (Ram Mandir) बांधले जात आहे. तर या मंदिराचा गाभारा सोन्याचा () असावा अशी मागणी शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे यासंदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलेले आहे. शिवसेनेचे पूर्व उत्तर प्रदेशचे प्रमुख संतोष दुबे (Shivsena East UP Head Santosh Dubey) यांनी हे सदर पत्र पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. साधारणतः पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामचंद्राच्या भव्य मंदिराची उभारणी केली जात आहे. देशातील कोट्यावधी नागरिक यासाठी समर्पण निधी देत आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात सुंदर हे मंदिर असावे, यासाठी राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा प्रभु श्रीराम यांच्या गरिमेप्रमाणे गाभारा असावा, यासाठी समाज संपूर्ण सहकार्य करेल, राम मंदिरासाठी अनेकांनी प्राणाची आहुती सुद्धा दिली, किंबहुना मोठा त्यागही केला आहे, असेही संतोष दुबे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com