त्रिपुरा (Tripura) येथील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर NLFT (National Liberation Front of Tripura) च्या अतिरेक्यांनी (Terrorist) केलेल्या हल्ल्यात उपनिरीक्षकासह सीमा सुरक्षा दलाचे (BSF) दोन जवान शहीद झाले आहेत. मंगळवारी बीएसएफचे जवान या भागात गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी हा जीवघेणा हल्ला केला.
बीएसएफने दिलेल्या माहीतीनुसार या चकमकीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपनिरीक्षक भुरु सिंह आणि कॉन्स्टेबल राज कुमार यांचा मृत्यू झाला. तसेच घटनास्थळी सापडलेल्या रक्ताच्या डागांवरून हे स्पष्ट होते की अतिरेक्यांनाही गोळ्या लागल्या आहेत. शहीद झालेले दोन्ही जवान अतिरेक्यांशी अत्यंत शौर्याने लढले आणि लढताना शहीद झाले. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात सखोल शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. तर या घटनेत शहीद जवानांची शस्त्रे सुद्धा अतिरेक्यांनी पळवुन नेल्याचे समजते आहे.
त्रिपुराच्या धालाई जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी BSF जवानांवर हा हल्ला केला. धलाईजवळील पानिसगर सेक्टरच्या चवमनू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आर.सी. नाथ बॉर्डरवरील चौकीजवळ दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले होते. धलाई जिल्हा राजधानी अगरतळापासून सुमारे 94 किमी दूर आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.