Rajya Sabha Election Result 2022: राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधील चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात सत्ताधारी काँग्रेसला तीन जागा जिंकण्यात यश आले आहे, तर भाजपच्या खात्यात एक जागा आली आहे. मीडिया दिग्गज सुभाष चंद्रा अपक्ष म्हणून रिंगणात होते, त्यांनाही भाजपचा पाठिंबा होता, मात्र तरीही त्यांना यश मिळू शकले नाही. चंद्रा यांना 30 मते मिळाली.
दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांना अतिरिक्त मते मिळाली. भाजपच्या आमदार शोभा राणी कुशवाह यांनी क्रॉस व्होट केले, त्याचप्रमाणे भाजपचे अधिकृत उमेदवार घनश्याम तिवारी यांनाही दोन अतिरिक्त मते मिळाली.
तसेच, राजस्थानमधील (Rajasthan) राज्यसभा निवडणुकीबाबत काँग्रेसचे मुख्य रणनीतीकार आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी पक्षाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, "राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला या तिन्ही नवनिर्वाचित खासदारांचे मी अभिनंदन करतो.
दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, "काँग्रेसकडे तीनही जागांसाठी आवश्यक बहुमत असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते परंतु भाजपने अपक्षांना उभे करुन घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. आमच्या आमदारांच्या एकजुटीने या प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2023 भाजप विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागेल.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.