Congress: काँग्रेसच्या पुढील अध्यक्षाचे नाव निश्चित! अशोक गेहलोत यांनी दिली मोठी अपडेट

Next Congress President: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' पूर्वी पक्षाध्यक्षांच्या नावाबाबत चर्चा रंगली आहे.
Ashok Gehlot
Ashok GehlotDainik Gomantak
Published on
Updated on

Next Congress President: काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' पूर्वी पक्षाध्यक्षांच्या नावाबाबत चर्चा रंगली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी सांगितले की, 'देशातील जातीय ध्रुवीकरणाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.' राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत, अशी पक्षाची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

'देशात गृहयुद्धाची परिस्थिती'

कन्याकुमारी येथे पत्रकार परिषदेत गेहलोत म्हणाले की, 'भाजप सरकारची धोरणे विभाजनकारी असून ती धोकादायक आहेत. ज्यामुळे देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊ शकतो. परंतु काँग्रेस हे होऊ देणार नाही. ध्रुवीकरणाचा मुकाबला हा या यात्रेचा केंद्रबिंदू आहे.' ते पुढे म्हणाले, 'ही परिस्थिती अशीच राहिली, तर देशात अराजकतेचे वातावरण निर्माण होईल.'

Ashok Gehlot
गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ JK मधील 64 काँग्रेस नेत्यांचा राजीनामा

अध्यक्षपदासाठी राहुल यांचे मन वळवणार

सीएम गेहलोत म्हणाले, 'राहुल गांधी हा संदेश घेऊन या पदयात्रेची सुरुवात करत आहेत. पंतप्रधान मोदींना त्यांची धोरणे बदलण्यासाठी अजून वेळ आहे.' गेहलोत पुढे म्हणाले की, 'राहुल गांधी यांनी आपण CWC नुसार काम करणार असल्याचे सांगितले आहे. आता आव्हाने मोठी असल्याने पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आम्ही त्यांचे मन वळवू.'

Ashok Gehlot
महागाई अन् बेरोजगारीवरुन काँग्रेस आक्रमक; प्रियंकासह, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

राहुल अध्यक्ष व्हावे, अशी काँग्रेसची इच्छा'

राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री पुढे असेही म्हणाले की, 'पक्ष जातीय सलोख्यासाठी काम करत राहील. लोक त्यात सामील होतील अशी पक्षाला आशा आहे. जातीय मुद्द्यांमुळे देश कमकुवत झाला असून पक्ष त्याविरोधात लढेल. गांधी घराण्याकडे सर्वाधिक विश्वासार्हता आहे, त्यामुळेच भाजप या घराण्यातील सदस्यांना लक्ष्य करत आहे.' गेहलोत शेवटी म्हणाले, "राहुल गांधी (Rahul Gandhi) अध्यक्ष व्हावेत, अशी संपूर्ण काँग्रेस (Congress) पक्षाची इच्छा आहे. अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाची सूत्रे लवकरच हाती घेतील."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com