दिल्ली-राजस्थानमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या संपूर्ण उत्तर भारताची स्थिती

IMD नुसार, हिमाचल, उत्तराखंडसह इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
India Weather News Update
India Weather News UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीसह उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीपासून दिलासा मिळाला होता, मात्र आता IMD हवामान खात्याने अनेक राज्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार, हिमाचल, उत्तराखंडसह इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. (India Weather News Update)

चला जाणून घेऊया आजचे हवामान कसे असेल

दिल्ली

आजपासून दिल्लीत ढगाळ वातावरण राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २६ फेब्रुवारीपर्यंत हवामान असेच राहील. या दरम्यान, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच जोरदार वारे वाहतील. हवामान खात्यानुसार वाऱ्यांचा वेग ताशी 25 ते 30 किलोमीटर असू शकतो. दिल्लीत आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश राहील.

India Weather News Update
जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिमवृष्टीमुळे सहा जण बेपत्ता

राजस्थान

राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव अजूनही कायम आहे. आज जयपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल. भारतीय हवामान खात्यानुसार, आज राज्यात ढगाळ आकाश आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 28 अंशांच्या आसपास राहील, तर किमान तापमान 15 ते 17 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

बिहार

पूर्वेकडील वाऱ्यामुळे आजपासून राज्यात हवामानात बदल दिसून येईल. राजधानी पाटणासह बिहारच्या नैऋत्य, दक्षिण-मध्य, दक्षिण-पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस अपेक्षित आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 25 ते 26 अंश, तर किमान तापमान 16 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

पंजाब

पंजाबमध्ये हवामान बदलले असून सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या पाच दिवस आकाश ढगाळ राहील आणि यादरम्यान पाऊस पडू शकतो. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 24 अंश तर किमान तापमान 11 अंश राहण्याचा अंदाज आहे.

जम्मू आणि काश्मीर

फेब्रुवारीअखेरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्यानेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जम्मू विभागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर काश्मीर विभागात बर्फवृष्टी होईल. आज श्रीनगर, काश्मीरमध्ये कमाल तापमान 1 आणि किमान तापमान -6 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पाऊस पडू शकतो. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 19 आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

उत्तराखंड

राज्याच्या अनेक भागात उद्यापासून तीन ते चार दिवस पाऊस पडू शकतो, त्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 10 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 1 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. असेच वातावरण पुढील दोन ते तीन दिवस राज्यात कायम राहणार असून, किमान तापमानातही घट होईल. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 11 अंश तर किमान तापमान 2 अंश राहण्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com