जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड हिमवृष्टीमुळे सहा जण बेपत्ता

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्याच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीमुळे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
South Kashmir
South KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्याच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीमुळे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे, त्यानंतर लष्कराने शोध मोहीम सुरू केली. अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खोऱ्यातील हवामानात बदल झाला आहे. या महिन्याच्या अखेरीस भरपूर बर्फवृष्टी झाल्याने असून त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) मैदानी भागात दोन ते तीन फूट, मध्य काश्मीरमध्ये एक ते दीड फूट आणि उत्तर काश्मीरमध्ये सहा इंच ते एक फूट एवढी बर्फवृष्टी झाली आहे. याशिवाय डोंगराळ भागात दोन ते चार फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन आणि सेवांवर देखील परिणाम झाला आहे. त्यामुळे श्रीनगरसह (Srinagar) अनेक भागात विजेचे टॉवर कोसळल्याने संपूर्ण काश्मीरची लाईट गेली आहे.

South Kashmir
UP Election : 'सत्तेसाठी भाजप तत्त्वांशी तडजोड करत नाही, आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरि'

याबाबत बोलताना आपत्ती व्यवस्थापन संचालक अमीर अली यांनी सांगितले आहे की, किश्तवाडच्या वारवान गावातील सहा लोक दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून मॉर्गन टॉप मार्गे पायी निघाले होते, त्याने मॉर्गन टॉपवरून 20 तासांपूर्वी कॉल करुन संपर्क साधला होता. तेव्हापासून त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले गेली आहे. अली म्हणाले की, लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे, परंतु अद्याप त्याचा शोध लागलेला नाही, हे लोक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त केली आहे.

जम्मू-काश्मीर प्रशासनाने बुधवारी सांगितले आहे की, अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या सर्व अत्यावश्यक सेवा सामान्य लोकांच्या सोयीसाठी युद्धपातळीवर पूर्ववत केल्या जात आहेत. विभागीय आयुक्त (काश्मीर) पीके पोळ म्हणाले आहेकत की, "मंगळवारपासून जोरदार बर्फवृष्टीनंतर काश्मीर खोऱ्यात होत आहे, युद्धपातळीवर सर्व अत्यावश्यक सेवा पूर्ववत केल्या जात आहेत." सामान्य जनतेने संयम राखून बाधित सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

South Kashmir
भारताच्या हवाई ताफ्यात झाली तीन राफेल विमानांची एन्ट्री!

आयुक्त म्हणाले, “मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाने टप्पा-1 अंतर्गत 70 टक्के बर्फ साफ करण्याचे काम प्राधान्याने पूर्ण केले आहे, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील बर्फ साफ केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com