Railway: रेल्वेने धाडली थेट देवाच्या नावाने नोटीस, चूक लक्षात येईपर्यंत...

रेल्वेने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील बजरंगबली यांनाच नोटीस बजावली आहे. रेल्वेची ही नोटीस सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेली अशीच एक मोहीम आजकाल लोकांच्या विरोधामुळे चर्चेत आहे, मात्र त्याचवेळी अशीच एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे रेल्वे प्रशासनावरही टीका होत आहे.

रेल्वेने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील बजरंगबली यांनाच नोटीस बजावली आहे. रेल्वेची ही नोटीस सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

Indian Railway
Indian RailwayDainik Gomantak

रेल्वेच्या ग्वाल्हेर विभागाशी संबंधित हे प्रकरण आहे. येथे सबलगडमध्ये रेल्वेने रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. आठ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेली ही नोटीस 'बजरंग बली, सबलगड' या नावाने आहे.

रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण सात दिवसांत हटवा, अन्यथा प्रशासन कारवाई करेल, ज्याचे कर्ज व खर्च अवैध अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Indian Railway
Adani Group: गौतम अदानी यांना अजून एक झटका; मुदत संपली, डीबी पॉवर अधिग्रहणाचा करार रद्द

दरम्यान, रेल्वेने देखील याप्रकरणी आपली चूक मान्य केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे प्रशासनाच्या चूक लक्षात आली आहे. उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, भगवान हनुमानाच्या नावाने नोटीस चुकून जारी करण्यात आली आहे.

चूक लक्षात आल्यानंतर ती तात्काळ दुरुस्त करण्यात आली आहे. आता हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याच्या नावाने नवी नोटीस जारी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com