Adani Group: गौतम अदानी यांना अजून एक झटका; मुदत संपली, डीबी पॉवर अधिग्रहणाचा करार रद्द

अदानी पॉवर आणि डीबी पॉवर यांच्यातील अधिग्रहणाचा करार रद्द झाला आहे.
Adani Group |
Adani Group |Dainik Gomantak

Adani Group: गौतम अदानी यांना अजून एक झटका बसला आहे. अदानी पॉवर आणि डीबी पॉवर यांच्यातील अधिग्रहणाचा करार रद्द झाला आहे. हा करार 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार होता, पण अंतिम मुदत उलटूनही अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

अदानी समूह आणि अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग यांच्यात वाद सुरू झाल्यापासून अदानी समूहाबाबत सातत्याने नकारात्मक बातम्या येत आहेत. यातच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

दैनिक भास्कर समूहाची वीज कंपनी डीबी पॉवर आणि अदानी पॉवर यांच्यातील करार आता होणार नाही. अदानी पॉवरने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डीबी पॉवरच्या अधिग्रहणाची घोषणा केली होती.

अदानी पॉवरने डीबी पॉवरच्या अधिग्रहणासाठी 7,017 कोटी रुपयांचा करार केला होता. यापूर्वी हा करार पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर होती. तो आधी नोव्हेंबर, नंतर 31 डिसेंबर आणि नंतर 15 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला, पण शेवटी करार पूर्ण होऊ शकला नाही आणि आता तो रद्द करण्यात आला आहे.

Adani Group |
'ब्रिटनमधील गोयकारांची काळजी घ्या', गोव्यात आलेल्या ऋषी सुनक यांच्या पत्नीकडे कोणी केली ही विनंती?

डीबी पॉवरचे छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात 1200 मेगावॅटचे थर्मल पॉवर प्लांट आहेत. छत्तीसगडमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी डीबी पॉवर खरेदी करण्याची अदानी पॉवरची योजना होती.

24 जानेवारीपासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान होत असताना कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

अदानी कंपनीवर यूएस-आधारित शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्च अकाउंटिंग फसवणूक आणि स्टॉक मॅनिपुलेशनचा आरोप करण्यात आला. अदानी पॉवरच्या समभागांनी 15 फेब्रुवारीलाही 5 टक्के ची लोअर सर्किट गाठली. गेल्या अनेक दिवसांपासून या स्टॉकमध्ये लोअर सर्किट जाणवत आहे.

अदानी पॉवरचे डिसेंबर 2022 तिमाहीचे निकालही खूपच निराशाजनक होते. कंपनीचा निव्वळ नफा 96 टक्के घसरून 8.77 कोटी रुपयांवर आला आहे. जास्त खर्चामुळे कंपनीचा निव्वळ नफा घसरला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 218.49 कोटी रुपये होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com