'आता युपीए अस्तित्वातच नाही', दिदींची तिसऱ्या आघाडीसाठी फिल्डिंग

नेता जर रस्त्यावर राहिला तरच विजय होतो.
Shadar Pawar & Mamata Banerjee
Shadar Pawar & Mamata Banerjee Dainik Gomantak
Published on
Updated on

देशात फॅसिझम सुरु असून त्या विरोधात उभे राहण्यासाठी पर्यायी शक्ती तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे देशातील राजकीय पक्षांनी यापुढे एकटे राहून चालणार नाही. आता यूपीए काही राहिलेली नाही, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्या आघाडीची फिल्डिंग लावण्यास महाराष्ट्रातून दिसून येत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shadar Pawar) यांची आज भेट घेऊन त्यांच्यात झालेल्या बैठकीने देशातील राजकारणाला एक वेगळीचं कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीच्या राजकारणातील गणिते वेगाने बदलतील असेही राजकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. आज झालेल्या शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीमध्ये कोणता निर्णय घेतला असेल, कोणत्या प्रकारची राजकीय समीकरणे बदलतील याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते.

Shadar Pawar & Mamata Banerjee
"आयुष्मान योजनेला केजरीवाल आयुष्मान होऊ देत नाहीत"

TMC अध्यक्षा ममता बॅनर्जी म्हणाल्या, देशात फॅसिझम सुरु आहे, त्यामुळे पर्यायी राजकीय शक्ती तयार केली पाहिजे. देशातील राजकीय पक्षांनी एकटे राहून चालणार नाही. कोणीही भांडत नसेल तर आम्ही काय करणार? पर्यायी ताकदीची चर्चा व्हायला हवी. यूपीए म्हणजे काय? अजून यूपीए नाही.

यावेळी बोलताना शदर पवार म्हणाले, तृणमुल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे जुने राजकीय संबंध आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचं आणि पश्चिम बंगालचेही जुने नाते आहे. नेता जर रस्त्यावर राहिला तरच विजय होतो.

तृणमुल, राष्ट्रवादी, शिवसेनेसह तिसऱ्या आघाडीची सुरुवात गोव्यातून?

दरम्यान, येणाऱ्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होेणार आहेत. या पाच राज्यांपैकी गोवा राज्याचाही यात समावेश आहे. गोव्यात कॉंग्रेसने विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी, तृणमुल कॉंग्रेस आणि शिवसेना या तिघांचं मनोमिलन गोव्यापासून सुरुवात होऊन थेट दिल्ली गाठणार का ? असाही तर्क राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com