Bhart Jodo Yatra: भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये; अशोक गेहलोत अन् सचिन पायलट सहभागी

Bhart Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 100 हून अधिक दिवस झाले आहेत.
Bhart Jodo yatra
Bhart Jodo yatraDainik Gomantak
Published on
Updated on

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातून जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज 19 डिसेंबर दौसा येथील बांदिकुई येथून पक्षाच्या नेत्यांसोबत भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींसोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस आमदार सचिन पायलट उपस्थित होते.

आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सकाळी 10 वाजता अलवरला पोहोचेल. बांदीकुईहून अलवरमध्ये प्रवेश करण्यासाठी या यात्रेचा प्रवेश बिंदू राजगडमधील सुरेर येथे आहे. राहुल गांधी मालाखेडा येथे दुपारी अडीच वाजता सभेला संबोधित करणार आहेत. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट उपस्थित राहणार आहेत.

  • राहुल गांधी यांनी नागरी संघटनांच्या सदस्यांची भेट घेतली

रविवारी म्हणजेच 18 डिसेंबरला भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील नागरी संघटनांच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिक्षणाचे 'सांप्रदायिकीकरण', आरोग्याचा अधिकार आणि अन्न सुरक्षा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. रविवारी यात्रा सुरू झाली तेव्हा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि ज्येष्ठ नेते सचिन पायलट हेही राहुल गांधींसोबत होते.

  • सचिन पायलटच्या समर्थनार्थ तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा बालेकिल्ला असलेल्या दौसामध्येही या यात्रेत तरुणांनी सहभाग घेतला. यावेळी तरुणांनी 'आमचा मुख्यमंत्री कसा असावा सचिन पायलटसारखा' अशा घोषणाही दिल्या. सचिन पायलटच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • ही यात्रा राजस्थाननंतर हरियाणात दाखल होणार

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. राहुल गांधी यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रा' सुरू केली. राजस्थाननंतर ही यात्रा हरियाणात दाखल होणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेचा शेवट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com