VIDEO: संसदेत हाय व्होल्टेज ड्रामा! राहुल गांधींनी रवनीत बिट्टू यांना म्हटलं "गद्दार", हस्तांदोलनास नकार देत केंद्रीय मंत्र्यांनीही लगावला जळजळीत टोला

Rahul Gandhi Ravneet Bittu Parliament Clash : राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात झालेली शाब्दिक चकमक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Rahul Gandhi Ravneet Bittu Parliament Clash
Rahul Gandhi & Ravneet BittuDainik Gomantak
Published on
Updated on

Congress BJP Clash : संसद परिसरात बुधवारी (4 फेब्रुवारी) विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यात झालेली शाब्दिक चकमक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. जेव्हा मकर द्वारजवळ काँग्रेस खासदार आंदोलन करत होते, तेव्हा तिथून जात असलेले रवनीत बिट्टू यांना पाहून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर "गद्दार" अशा शब्दांत टीका केली. "बघा, एक गद्दार इथून जात आहे, याचा चेहरा बघा," असे म्हणत राहुल गांधींनी बिट्टू यांच्याकडे इशारा केला.

विशेष म्हणजे, या टीकेनंतर राहुल गांधींनी हस्तांदोलनासाठी हात पुढे करत बिट्टू यांना टोला लगावला की, "नमस्ते भाई, माझे गद्दार मित्र. काळजी करु नकोस, तू पुन्हा काँग्रेसमध्ये परत येशील." बिट्टू हे पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, परंतु निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत.

Rahul Gandhi Ravneet Bittu Parliament Clash
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या आक्रमक टीकेला रवनीत बिट्टू यांनीही तितक्याच जळजळीत शब्दांत उत्तर दिले. त्यांनी राहुल गांधींना "देशाचे शत्रू" असे संबोधित करत हस्तांदोलनास स्पष्ट नकार दिला. बिट्टू यांनी पलटवार करताना म्हटले की, "जे लोक देशाचे शत्रू आहेत, त्यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही." यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये संसदेच्या आवारातच वादावादी झाली. राहुल गांधींनी त्यांच्या पक्षबदलावरुन निशाणा साधला, तर बिट्टू यांनी गांधी घराण्यावर देशहिताशी तडजोड केल्याचा आरोप करत ही लढाई व्यक्तिगत स्तरावर नेली.

Rahul Gandhi Ravneet Bittu Parliament Clash
Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, संसदेच्या (Parliament) पायऱ्यांवर काँग्रेस खासदारांचे तीव्र आंदोलन सुरु होते. "पंतप्रधानांनी तडजोड केली आहे" असे पोस्टर्स हातात घेऊन भारत-अमेरिका व्यापार करारावरुन विरोधकांनी सरकारला घेरले. या आंदोलनादरम्यान मंगळवारी गैरवर्तवणुकीचा ठसा उमटवत निलंबित करण्यात आलेले आठ खासदारही सहभागी झाले होते.

बजेट सत्राच्या उर्वरित काळासाठी निलंबित झालेल्या या खासदारांनी संसदेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकरणाने सत्ताधारी आणि विरोधकांमधील दरी अधिकच रुंदावली असून राहुल गांधी आणि बिट्टू यांच्यातील हा "दोस्त की गद्दार" असा वाद सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com