NMP मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) निशाणा साधला आहे. मोदींनी देशातील सर्व काही विकले असे म्हणत केंद्र सरकारने (Central Government) तरुणांच्या हातातून रोजगार हिसकावला असल्याची टीका देखील त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मित्रांना' मदत करत आहेत मात्र कोरोना मध्ये सरकारने लोकांना मदत केली नाही असे सांगत जोरदार हल्ला चढवला आहे. (Rahul Gandhi: Modi government have basically destroyed what the UPA built)
“रस्ते, रेल्वे, वीज क्षेत्र, पेट्रोलियम पाइपलाइन, दूरसंचार, गोदाम, खाणकाम, विमानतळ, बंदर, स्टेडियम नेमके कोणाला जात आहे? हे सर्व बनवण्यासाठी 70 वर्षे लागली होती मात्र आता हे सगळे तीन-चार लोकांना दिले जात आहे आणि सरकार तुमचे भविष्य विकत असल्याचेही राहुल गांधींनी सांगितले आहे.
तर "आम्ही खाजगीकरणाच्या विरोधात नाही. आमचे खाजगीकरण तार्किक होते. तोटा निर्माण करणाऱ्या कंपनीना सावरण्यासाठी खासगीकरण ही संकल्पना वापरली जाते मात्र रेल्वेसारखा महत्त्वाचा विभाग यात येऊच शकत नाही. आता एकाधिकार निर्माण करण्यासाठी खासगीकरण केले जात आहे. आणि यातून रोजगार मिळणे बंद होईल . "
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (NMP) ची घोषणा केली होती . या अंतर्गत, पॅसेंजर गाड्या, रेल्वे स्टेशन ते विमानतळ, रस्ते आणि स्टेडियमचे मुद्रीकरण समाविष्ट आहे. या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खाजगी कंपन्यांना सामील करून संसाधने एकत्रित केली जातील आणि मालमत्ता विकसित केली जाईल.खासगी गुंतवणूक मिळवण्यासाठी चेन्नई, भोपाळ, वाराणसी आणि वडोदरासह भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सुमारे 25 विमानतळे, 40 रेल्वे स्टेशन, 15 रेल्वे स्टेडियम आणि अनेक रेल्वे वसाहती नेमल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.