NMP: देशातील 400 रेल्वे स्टेशन, 25 विमानतळ, रस्ते खाजगी कंपन्यांच्या ताब्यात

रेल्वेच्या ब्राऊनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर मालमत्तांच्या विक्रीतून सरकार पुढील चार वर्षात सुमारे 1.52 लाख कोटी रुपये उभारणार आहे. (National Monetisation Pipeline)
National Monetisation Pipeline railway station, airports, roads on rent to private company
National Monetisation Pipeline railway station, airports, roads on rent to private company Dainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रीय NMP (National Monetisation Pipeline) योजने अंतर्गत देशातील एकूण 400 रेल्वे स्थानके (Railway Station), 90 प्रवासी गाड्या, रेल्वे स्टेडियम आणि वसाहती तसेच प्रसिद्ध कोकण (Kokan Railway) आणि हिल रेल्वेची निवड भांडवल उभारणीसाठी सरकारने केली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन (NMP) मध्ये, रेल्वे नंतर रस्ता (Roads) हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा क्षेत्र आहे, ज्याला सरकारने आपल्या मुद्रीकरणासाठी निवडले आहे. (National Monetisation Pipeline railway station, airports, roads on rent to private company)

रेल्वेच्या ब्राऊनफिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर मालमत्तांच्या विक्रीतून सरकार पुढील चार वर्षात सुमारे 1.52 लाख कोटी रुपये उभारणार आहे. सुमारे 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईनमधून, सरकार रेल्वेच्या पायाभूत सुविधांद्वारे 26 टक्के नफा वाढवेल.

National Monetisation Pipeline railway station, airports, roads on rent to private company
अर्थमंत्र्यांनी केली NMP योजनेची घोषणा, 6 लाख कोटी रुपयांसाठी केंद्राचे मोठे पाऊल

आर्थिक वर्ष 2022-25 दरम्यान कमाई करण्यासाठी सरकारने 400 रेल्वे स्टेशन, 90 प्रवासी गाड्या, 1,400 किमी रेल्वे ट्रॅकचा एक मार्ग, कोकण रेल्वेचा 741 किमीचा मार्ग , 15 रेल्वे स्टेडियम आणि निवडक रेल्वे वसाहती निवडल्या आहेत. 2022-25 दरम्यान सरकार रेल्वे स्थानकांच्या मुद्रीकरणाद्वारे आणि प्रवासी रेल्वे संचालनाद्वारे अनुक्रमे 76,250 कोटी आणि 21,642 कोटी रुपये उभारणार आहे.

सरकार 25 विमानतळांच्या कमाईद्वारे 20,782 कोटी रुपये उभारणार -

तसेच सरकार पुढील चार वर्षांत वाराणसी, चेन्नई, नागपूर आणि भुवनेश्वरसह अन्य २५ विमानतळे सुद्धा खाजगी कंपन्यांना देऊन याद्वारे सरकार 20,782 कोटी रुपये उभारणार आहे.सरकारच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइनमध्ये विमानतळ क्षेत्राचे योगदान 4 टक्के असेल. NMP दस्तऐवजानुसार, 25 प्रमुख विमानतळांमध्ये उदयपूर, देहरादून, इंदूर, रांची, कोईमतूर, जोधपूर, वडोदरा, पाटणा, विजयवाडा आणि तिरुपती यांचा समावेश आहे.

1.60 लाख कोटी रुपयांची कमाई रस्त्यांमधून-

या NMP पाइपलाइन योजने अंतर्गत, सरकार पुढील चार वर्षांत 1.60 लाख कोटी रुपयांची कमाई फक्त रस्ते मार्गातून केली जाईल सोमवारी या पाईपलाईनचे लोकार्पण करताना सीतारामन यांनी सांगितले होते की, या मोहिमेअंतर्गत रस्ते विकले जाणार नाहीत परंतु रस्त्यातून सरकार मोठ्या प्रमाणात कमाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com