

Rahul Gandhi Purvanchal Expressway Accident
उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या ताफ्यातील अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना समोर आली आहे. पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर झालेल्या या अपघातात काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सुरक्षेशी संबंधित काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत राहुल गांधी सुरक्षित असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वांचल एक्स्प्रेसवेवरील ९१ व्या किलोमीटरच्या मैलाच्या दगडाजवळ हा अपघात झाला. राहुल गांधी यांच्या ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका यांची एकमेकांना धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेमुळे ताफ्यातील काही जण जखमी झाले असून, जखमींची नेमकी संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
राहुल गांधी हे लखनऊहून सुलतानपूरच्या दिशेने प्रवास करत होते. त्याचदरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. ताफ्यातील गाड्यांची एकमेकांना धडक कशी बसली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे का, तसेच प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.