Ragpicker with letterhead bearing United Nations stamp found Rs 25 crore in Bengaluru.
Ragpicker with letterhead bearing United Nations stamp found Rs 25 crore in Bengaluru.Dainik Gomantak

United Nations चा शिक्का असलेल्या लेटरहेडसह कचरावेचकाला सापडले 25 कोटी रुपये

नेहमीप्रमाणे सुलेमान नागावरा रेल्वे स्थानकावर प्लास्टिक आणि बाटल्या गोळा करत होता. दरम्यान, कचरा गोळा करत असताना त्याची नजर एका काळ्या पिशवीवर पडली. आणि पुढे जे काही घडले ते सुलेमानसाठी धक्कादायकच होते.
Published on

Ragpicker with letterhead bearing United Nations stamp found Rs 25 crore in Bengaluru:

बेंगळुरूच्या अमृतहल्ली येथील एका 39 वर्षीय कररा वेचकाला काही दिवसांपूर्वी शहरातील नागावरा रेल्वे स्थानकात आणि आसपासच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 30 लाख डॉलर्स (रु. 25 कोटी) असलेली प्लास्टिकची पिशवी सापडली.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सुलेमान एसके नावाच्या कचरा वेचकाने सांगितले की, कचऱ्यात 30 लाख डॉलर्स सापडल्यानंतर त्याने ते घरी आणले. त्याचे काय करावे हे त्याला कळेना. यानंतर त्याने भंगार व्यावसायिक बाप्पा यांना घटनेची माहिती दिली.

बाप्पा यांनी सुलेमानला पैसे त्यांच्याकडे ठेवण्यास सांगितले. मात्र, सलेमनला ते पटले नाही. म्हणून त्याने रविवारी स्वराज इंडियाचे सामाजिक कार्यकर्ते कलीम उल्ला यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर करीम उल्लाह यांनी शहर पोलिस आयुक्त बी दयानंद यांना ही माहिती दिली. “जेव्हा मी आयुक्तांना पैशाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी मला सुलेमानला आणि पैसे घेऊन त्यांच्या कार्यालयात येण्यास सांगितले.

तेव्हा अजूनही धक्क्यात असलेल्या सुलेमानने रेल्वे ट्रॅकवर पैसे सापडल्याचा खुलासा केला. आयुक्तांनी ताबडतोब हेब्बल पोलिसांना बोलावले आणि त्यांना घटनास्थळाची पाहणी करण्यास सांगितले.


Ragpicker with letterhead bearing United Nations stamp found Rs 25 crore in Bengaluru.
भारताविरुद्ध सतत विष ओकणारा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी Akram Ghazi याची पाकिस्तानात हत्या

पैशांसोबतच सुलेमानला प्लॅस्टिकच्या पिशवीत UN सील असलेले एक पत्रही सापडले. "आर्थिक आणि वित्त समितीने दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्याला मदत करण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी मतदान केलेल्या विशेष निधीची स्थापना केली," असे पत्रात म्हटले आहे.

"या भागात स्केलेटन बँकिंग ऑपरेशन्स, दहशतवादी आणि हुकूमशहांसारख्या अनधिकृत व्यक्तींकडून अशा निधीचे अपहरण झाल्यामुळे, संयुक्त राष्ट्रांनी नोटांची सुरक्षितता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नोटांवर दृश्यमान लेझर स्टॅम्प लावण्याची विनंती केली होती", असे या पत्रात पुढे म्हटले आहे.


Ragpicker with letterhead bearing United Nations stamp found Rs 25 crore in Bengaluru.
Viral Video: "Hamas आमच्यावर हल्ला करणार हे त्यांना आधीच माहीती होते...", इस्रायलचा 6 फोटो पत्रकारांवर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, सुलेमान शेख हा पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो बेंगळुरूमध्ये कचरा वेचण्याचे काम करतो.

नेहमीप्रमाणे सुलेमान नागावरा रेल्वे स्थानकावर प्लास्टिक आणि बाटल्या गोळा करत होता. दरम्यान, कचरा गोळा करत असताना त्याची नजर एका काळ्या पिशवीवर पडली. त्याने बॅग उचलून उघडली तेव्हा त्याला त्यामधील पैसे पाहूण आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्याने हे पैसे घरी नेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com