‘’दारु ऑफर करायचे, अश्लील अन् असभ्य वर्तन करायचे...’’ काँग्रेस नेत्यांवर महिला नेत्याचे गंभीर आरोप

Radhika Khera Alleged Congress Leaders: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
Radhika Khera Alleged Congress Leaders
Radhika Khera Alleged Congress LeadersANI

Radhika Khera Alleged Congress Leaders: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच, राधिका खेडा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर खळबळजनक आरोप केले.

राधिका यांनी काँग्रेस का सोडली? काँग्रेसच्या (Congress) नेत्याने त्यांच्याबाबतीत काय केले? ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा का राजीनामा दिला? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे राधिका यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेत राधिका यांनी अनेक मोठे गौफ्यस्फोट केले. त्यांनी थेट काँग्रेस नेत्याने केलेल्या अभद्र आणि अश्लील कृत्याबद्दल सांगितले. राधिका यांनी सांगितले की, ‘त्यांनी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांच्याकडेही याबाबतीत तक्रार केली, परंतु कोणीही कोणतीही कारवाई केली नाही.’

Radhika Khera Alleged Congress Leaders
Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

दरम्यान, काँग्रेस राम, हिंदू आणि सनातनी विरोधी असल्याचे राधिका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राधिका यांनी सांगितले की, ‘’मी याबाबतीत अनेकदा ऐकले, पण या सर्व गोष्टींवर माझा विश्वास कधीच बसला नाही. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यावर मला वास्तव कळले. आजीसोबत मी अयोध्येला गेले आणि तिथून परतल्यावर घराच्या दारावर ‘जय श्री राम’ चा ध्वज लावला. त्यानंतर काँग्रेस पक्ष माझा तिरस्कार करु लागला. जेव्हा मी फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केले तेव्हा मला खडसावण्यात आले. त्यांच्याकडून मला विचारण्यात आले की, मी तिथे का गेली? काँग्रेसच्या नेत्यांनी मला भगवान रामाबद्दल बोलण्यापासून रोखले.’’

पत्रकार परिषदेत राधिका यांना एकदमच रडू कोसळले

पत्रकार परिषदेत बोलताना राधिका यांना एकदमच रडू कोसळले. त्या म्हणाल्या की, ‘’छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) माझा सातत्याने अपमान करण्यात आला. सुशील आनंद शुक्ला यांनी मला कोरबा येथे दारु ऑफर केली. भारत जोडो यात्रेदरम्यान मला हॉटेलमध्ये दारु ऑफर करण्यात आली. शुक्ला मला रात्री फोन करायचे. एकदा रात्री 1 वाजता सुशील आनंद यांनी माझ्या रुमचा दरवाजा ठोठावला. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन करुन शिवीगाळ केली.’’

Radhika Khera Alleged Congress Leaders
Rahul Gandhi: ''जेव्हा सरकार बदलेल, तेव्हा लोकशाही कमजोर करणाऱ्यांना...''; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

राधिका यांनी पुढे सांगितले की, ‘’सुशील आनंद माझ्यावर इतक्या जोरात ओरडायचे की मला रडू कोसळायचे. दोन प्रवक्त्यांनी एकदा माझ्या रुमचा दरवाजा अचानक बाहेरुन बंद केला. आजही त्या प्रसंगाची आठवण झाली की झोप उडते.’ सचिन पायलट यांना मी आपबिती सांगितली असता निवडणुकीचा हंगाम सुरु आहे, गप्प बसा, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.’’ राधिका यांनी शेवटी सांगितले की, ‘’ या प्रकरणात भूपेश बघेल म्हणाले की, तुम्ही छत्तीसगड सोडा. जयराम रमेश आणि पवन खेडा यांनी तर फोनच उचलला नाही.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com