PVR-INOX Leisure यांचे विलीनीकरण; बनणार देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन

देशातील दोन सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स चेन PVR आणि INOX Leisure यांचे विलीनीकरण
PVR-INOX Leisure
PVR-INOX Leisure dainik gomantak
Published on
Updated on

मुंबई : देशात सर्व चित्रपट रसीकांचे चित्रपट पाहण्याचे आवडते ठिकाण म्हणजे चित्रपटगृह. त्यातल्या त्यात मोठ्या शहरात PVR आणि INOX Leisure ला पहिली पसंत. पण मागील काही वर्षांत हे दोन्ही वेगळे असल्याचे चित्रपटाचे बुकिंग करताना किंवा तेथे जाऊन पहायचा झाल्यास PVR की INOX अशी द्विधा मनस्थिती तयार व्हायची. पण आता हा प्रश्नच मार्गी लागला असून PVR आणि INOX Leisure यांचे विलीनीकरण झाले असून तशी मंजुरी दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने दिली आहे. त्यामुळे देशातील 1500 स्क्रीन्स असणारी सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन ठरणार आहे. (PVR Limited and Inox Leisure Ltd on Sunday announced their decision to merge)

कोरोना काळात अनेक महिने चित्रपटगृहे (Theaters) ही बंद होती. त्यामुळे PVR आणि INOX Leisure चे मोठे नुकसान झाले. त्यातच OTT प्लॅटफॉर्म सारखा नवा मार्ग समोर आल्याने अनेक निर्माते दिग्दर्शक OTT कडे वळाले. त्याचाही परिणाम चित्रपटगृह व्यवसायाला झाला. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाचे प्रस्ताव पुढे आले.

तसेच PVR चे CMD अजय बिजली यांची संयुक्त कंपनीचे MD म्हणून नियुक्ती होणार असून संजीव कुमार हे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतील. तर INOXचे चेअरमन पवन कुमार जैन हे बोर्डाच्या नॉन एक्झिक्युटिव्ह अध्यक्षपदी असतील आणि सिद्धार्थ जैन हे नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉन-इंडिपेंडंट संचालक म्हणून काम करतील.

PVR-INOX Leisure
JNU, JMI, DU या केंद्रीय विद्यापीठांसाठी CUET 2022 ची प्रक्रीया सुरू

PVR ही भारतातील सध्याची सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन असून देशात 860 स्क्रीन असून, INOX Leisure च्या 667 स्क्रीन आहेत. तर मेक्सिकोमध्ये मुख्यालय असणाऱ्या सिनेपोलिसच्या 400 स्क्रीन्स आहेत. तर या विलीनीकरणामुळे ही सर्वात मोठी मल्टिप्लेक्स (Multiplex) चेन होईल. यानंतर INOX Leisure सह PVR च्या शेअर्स वाढ झाल्याचे दिसून आले. INOX Leisure चे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढून 470 प्रति शेअर वर बंद झाले. तर PVRचे शेअर्स (Shares) 1.55 टक्क्यांनी वाढून 1804 रुपयांवर बंद झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com