JNU, JMI, DU या केंद्रीय विद्यापीठांसाठी CUET 2022 ची प्रक्रीया सुरू

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान
Application process for CUET
Application process for CUETdainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना देशातील नामवंत JNU, JMI, DU सारख्या केंद्रीय विद्यापीठांत शिक्षण घेण्याची ईच्छा असते. मात्र अनेकांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टसाठी अर्ज कसे करावेत? ते कधी करावेत याची माहिती नसते. त्यामुळे मनात ईच्छा असूनही अनेकांना कॉमन युनिव्हर्सिटी आपला प्रवेश निश्चित करता येत नाही. पण ही संधी आता चालून आलेली आहे. ज्यांना कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश घ्यायचा आहे. ही बातमी त्यांच्यासाठी असून केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) प्रवेशासाठी अर्ज 2 एप्रिलपासून सुरू होणार असून 30 एप्रिल शेवटची तारिख आहे. तर CUET ची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नुकतेच CUET अनिवार्य करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) या परीक्षेच आयोजन करते. तर samarth.edu.in वर जाऊन अर्ज भरता येईल. (Application process for CUET to start from April 2)

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टसाठी अर्ज 2 एप्रिलपासून सुरू होणार असून CUET ची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. तर ही परीक्षा संगणक आधारित असेल. जी संगणकावर परीक्षा द्यायाची आहे. या परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडावा लागेल. केंद्रीय विद्यापीठातील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल. तसेच या परीक्षेतील प्रश्नांची पातळी बारावीची असेल. जे विद्यार्थी 12वीमध्ये शिकत आहेत ते देखील CUET (UG) – 2022 चाचणी देऊ शकतील. तसेच गतवर्षी बारावी उतीर्ण झालेला विद्यार्थी ही CUET – 2022 मध्ये अर्ज करू शकतो. UGC ने राज्य, मानीत आणि खाजगी विद्यापीठांना (University) सांगितले आहे की ते CUET 2022 च्या स्कोअरद्वारे देखील त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी प्रवेश देऊ शकतात. विद्यापीठांना हवे असल्यास ते CUET गुणांसह बारावीची किमान टक्केवारीही ठरवू शकतात.

Application process for CUET
DRDO: भारताची ओडिशाच्या किनारपट्टीवर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

तसेच CUET हे जुन्या सेंट्रल युनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्टचे (CUCET) नवीन स्वरूप आहे. यापूर्वी देशातील 14 केंद्रीय विद्यापीठे (Central University) कॉमन एंट्रन्स टेस्टअंतर्गत येत होती. तर जामिया, डीयू (DU), जेएनयू (JNU) विद्यापीठे स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेत होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागत होत्या. मात्र आता नवीन शैक्षणिक (Academic) धोरणानुसार सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्यात आले आहे, ज्याला CUET 2022 असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी उमेदवार NTA वेबसाइट nta.ac.in ला भेट देऊ शकतात. तर NTA च्या हेल्पलाइनवर 011-40759000 किंवा 011-6922 7700 वर कॉल करून किंवा cuet-ug@nta.ac.in वर NTA ला ईमेल लिहून प्रश्न विचारू शकता.

Application process for CUET
सोनियांशी झाली चर्चा, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर काँग्रेससोबत?

CUET (UG) 2022 परीक्षा ही चार विभागात विभागलेली असेल. त्यात विभाग IA असेल जो भाषा विभाग आहे. यात 13 वेगवेगळ्या भाषा असतील ज्यातून आपण आपली भाषा (Language) निवडू शकतो. तर विभाग IB 19 हा ही भाषा विभाग असून येथे आणखीन 19 भाषा आहेत. यापैकी ही आपण आपली भाषा निवडू शकतो. ज्यात 50 प्रश्न असतील, त्यापैकी 40 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

विभाग II: 27 यात डोमेन विशिष्ट विषयांचा असेल. त्यापर्यायांपैकी जास्तीत जास्त 6 विषय उमेदवारांना निवडता येतील. येथेही 50 प्रश्न असतील, ज्यापैकी 40 उत्तरे द्यावी लागतील. विभाग III: यामध्ये सामान्य चाचणी असेल, 75 प्रश्नांपैकी 60 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com