पटियालामध्ये तणाव, इंटरनेट बंद, आयजींना हटवले, सुरक्षा दल तैनात

काली माता मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि परिसराजवळ दगडफेक करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना अटक
Punjab
PunjabANI
Published on
Updated on

Punjab: पटियाला येथे काल शुक्रवारी खलिस्तान मुर्दाबाद मोर्चादरम्यान शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते आणि खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पटियालामध्ये (Patiala) रात्री साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. अफवा पसरू नयेत यासाठी पंजाब सरकारच्या गृह विभागाने आदेश जारी केले आहेत. त्याचबरोबर पटियालाचे आयजी राकेश अग्रवाल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. आता पटियालाचे नवे आयजी म्हणून मुखविंदर सिंग चिन्ना, नवे एसएसपी म्हणून दीपक पारिक, आणि वजीर सिंग यांची पटियालाचे नवीन एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Punjab Violence)

हिंदू संघटनांनी आज पटियाला बंदची हाक दिली आहे. यासोबतच काली माता मंदिरावरील (Shri Kali Devi Temple) हल्ल्यातील दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी धरणे, रोष मोर्चाही काढण्यात आला आहे. यावेळी पटियालाचे एसएसपी नानक सिंह यांनी सांगितले की, पटियालामधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. दुसरीकडे हिंदू संघटनेच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी पटियालाचे वरिष्ठ एसपी नानक सिंह यांनी भारतीय हिंदू सुरक्षा समितीचे प्रमुख गिरीजी महाराज यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

Punjab
पुन्हा एक 'गंगाराम चौधरी', 58 वर्षीय आमदार बसलेय 10वीच्या परीक्षेला, 40 वर्षानंतर शिक्षणाचे वेध

काली माता मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि परिसराजवळ दगडफेक करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांना अटक करण्याची मागणी हिंदू संघटना करत आहेत. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या हरीश सिंगला यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी 7 ते शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती.

या हिंसाचारात दोन पोलिसांसह चार जण जखमी झाले आहेत.

या घटनेच्या विरोधात शिवसेना हिंदुस्थान या हिंदू संघटनेने आज 30 एप्रिल रोजी पटियाला बंदची हाक दिली आहे. शिवसेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन गुप्ता यांनी काली देवी मंदिराचा खलिस्तानविरोधातील मोर्चाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. खलिस्तान समर्थकांनी मंदिरावर हल्ला करून मंदिराची विटंबना केली आहे. खलिस्तान समर्थकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी बंदची घोषणा केली आहे.

Punjab
Punjab: पटियालामध्ये शिवसैनिक अन् शीख संघटनांमध्ये हाणामारी

या हिंसाचारात एका पोलिसासह चार जण जखमी झाले आहेत

पटियाला येथील संघर्षाच्या या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) नानक सिंग यांनी सांगितले की, खलिस्तानविरोधी मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. चकमकीदरम्यान पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लोकांना पांगवण्यासाठी गोळीबार केला. ड्युटी मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसारच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले.

दरम्यान काल, पटियालामध्ये मिरवणूक काढताना गदारोळ झाला. शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थक शीख संघटना समोरासमोर आल्या. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. दोन्ही बाजूंना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्याचवेळी तलवारीमुळे एक पोलीस (Police) कर्मचारी जखमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com