पंजाबमधील नागरिकांना दिलासा; कोरोनाचे निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश

नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत यांचे कोरोनाचे सर्वच निर्बंध हटविण्याचे आदेश
bhagwant man
bhagwant mandainik gomantak
Published on
Updated on

चंडीगढ : आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पहिल्यांदाच आपले पाऊल राज्याबाहेर टाकत पंजाबची सत्ता खेचून आणली आहे. येथे पारंपारिक काँग्रेसला तर केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपशी दोन हात करत नवा इतिहास रचला आहे. आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार भगवंत मान उद्या १६ मार्चला शहीद भगतसिंह यांच्या गावात जात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी घोषणा केली असून राज्यातील कोरोनाचे सर्वच निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. (Punjab government on Tuesday removed all existing restrictions on Corona in the state)

दरम्यान देशात कोरोना बाधीतांच्या संख्येत घट झाली असून यामुळे देशातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. तर पंजाबमधील (Panjab) कोरोनाची स्थितीही नियंत्रणात आली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने (Government) मोठा निर्णय घेत राज्यातील कोरोनाचे (Corona) सर्वच निर्बंध तात्काळ हटविण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.

bhagwant man
पराभवानंतर गांधी घराण्यावर प्रश्नचिन्ह! चिदंबरम म्हणाले - पक्षाचा प्रत्येकजण जबाबदार...

मुख्यमंत्रीपदाची शपथ 16 मार्चला

पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री (CM) भगवंत मान हे 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला किमान तीन ते चार लाख नागरिक आपली उपस्थिती लावणार असून त्याची तयारी सुरू आहे. शपथविधीसाठी 8 हजार पोलिस (Police) कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com