अमरिंदर सिंग भाजपच्या वाटेवर ?

आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यांनतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) आज दिल्लीला रवाना होणार आहेत.
Punjab EX Chief Minister Captain Amarinder Singh will join the BJP ?
Punjab EX Chief Minister Captain Amarinder Singh will join the BJP ?Dainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (Punjab Chief Minister) दिल्यांनतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) आज दिल्लीला रवाना होणार आहेत. राजीनाम्यांनंतर ते पहिल्यांदाच दिल्लीत (Delhi) जात आहेत आणि आता ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. (Punjab EX Chief Minister Captain Amarinder Singh will join the BJP ?)

पंजाबच्या राजकारणातील गोंधळ अजूनही सुरूच आहे. वास्तविक, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कॅप्टन सिंह आज दिल्लीला रवाना होणार असल्याची बातमी येत आहे. ते दुपारी साडेतीन वाजता निघणार आहेत असे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ते दिल्लीत जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेणार आहेत.

अलीकडेच, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी पक्षात सुरू असलेल्या वादानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी काँग्रेसने त्यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री बनवले. त्याचबरोबर, दीर्घकाळ चाललेल्या वादामुळे, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन पक्ष देखील सोडू शकतात , अशी अटकळ बांधली जात होती.

Punjab EX Chief Minister Captain Amarinder Singh will join the BJP ?
Breaking: 'अमरिंदर सिंह काँग्रेस पक्षाला हानी पोहचवणार नाहीत': गेहलोत

पक्षात अपमानित वाटतं

राजीनामा दिल्यानंतर कॅप्टनने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले होते की राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा हे त्यांच्या मुलांसारखे आहेत, पण पंजाबच्या बाबतीत त्यांनी ज्या पद्धतीने वागले ते त्यांची अनुभवहीनता दर्शवते. त्याचवेळी, त्यांनी असेही म्हटले होते की, पक्षात सुरू असलेल्या वादामुळे त्यांना अपमानित वाटत आहे, यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांच्या या नाराजीला उत्तर देताना पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी असेही म्हटले आहे की अमरिंदर सिंह यांचे वक्तव्य त्यांच्या कदनुसार नाही, तर ते काँग्रेसचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी रागाच्या भरात काही बोलले असावे हे शक्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com