क्रिकेट विश्वात खळबळ! टीममध्ये एन्ट्रीसाठी चक्क बनावट कागदपत्रे; स्टार खेळाडू अडचणीत, BCCIकडे तक्रार दाखल

Cricket Controversy: भारतीय क्रिकेटमध्ये वयोगटातील फेरफार किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे संघात स्थान मिळवण्याचे प्रकार नवीन नाहीत.
Cricket Controversy
Cricket ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेटमध्ये वयोगटातील फेरफार किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे संघात स्थान मिळवण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, आता पुदुचेरी क्रिकेट संघ एका मोठ्या वादात सापडला आहे. पुदुचेरी नेटिव्ह क्रिकेट प्लेयर असोसिएशनने (PNCPA) बीसीसीआयच्या (BCCI) भ्रष्टाचार विरोधी युनिटकडे (ACU) सात्विक देसवाल नावाच्या खेळाडूविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. सात्विकने संघात स्थान मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांचा नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सात्विक देसवाल हा १८ वर्षांचा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. नियमानुसार, एखाद्या राज्याच्या संघातून खेळण्यासाठी तो खेळाडू त्या राज्याचा किमान एक वर्ष 'बोनाफाईड' रहिवासी असणे आवश्यक असते. मात्र, तक्रारीनुसार सात्विक हा निकष पूर्ण करत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, सात्विक १० ऑगस्ट २०२५ पर्यंत हरियाणा क्रिकेट असोसिएशनच्या लीगमध्ये खेळत होता, असा दावाही ईमेलमध्ये करण्यात आला आहे. इतक्या कमी कालावधीत तो पुदुचेरीचा रहिवासी कसा झाला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Cricket Controversy
Goa Cristmas Celebration: नाताळनिमित्त राजधानीत विद्युत रोशणाई, चर्चस्क्वेअर परिसर सजला; राज्यात उत्साहाचे वातावरण

बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

असोसिएशनने पाठवलेल्या ईमेलमध्ये बीसीसीआयच्या 'अँटी करप्शन युनिट'वर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तक्रार करून महिना उलटला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. "अनेक खेळाडू अशाच चुकीच्या मार्गांचा अवलंब करून पुदुचेरीसाठी खेळत आहेत. यामुळे पात्रता पडताळणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे," असे असोसिएशनने म्हटले आहे. जर या आठवड्यापर्यंत उत्तर मिळाले नाही, तर हे प्रकरण मीडियासमोर नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Cricket Controversy
Goa Nightclub Fire: अजय गुप्ताला पाच दिवसांची पोलिस कोठडी, रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर

५० कोटींच्या अब्रुनुकसानीचा इशारा

दुसरीकडे, क्रिकेट असोसिएशन ऑफ पुदुचेरीचे माजी अध्यक्ष पी. दामोदरन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी या तक्रारीला 'कपोलकल्पित कथा' असे संबोधले आहे. दामोदरन यांच्या मते, हे आरोप पूर्णपणे चुकीचे असून असोसिएशनच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहेत. याप्रकरणी ते पुदुचेरी नेटिव्ह क्रिकेट प्लेयर असोसिएशनवर ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहेत. सध्या हे प्रकरण बीसीसीआयच्या कोर्टात असून, येणाऱ्या काळात सात्विक देसवालच्या करिअरवर आणि पुदुचेरी क्रिकेटच्या विश्वासार्हतेवर याचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com