केरळमधील (Kerala) पलक्कड जिल्ह्यातील (Palakkad District) एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना 'सर' किंवा 'मॅडम' ऐवजी 'शिक्षक' म्हणण्यास सांगितले आहे. पलक्कड जिल्ह्यातील ओलासेरी (Olassery Village) गावात असलेली सरकारी अनुदानित सीनियर बेसिक स्कूल जेंडर इक्वलिटी (Gender Equality) आणणारी राज्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या 300 आहे. यामध्ये 9 महिला शिक्षक आणि आठ पुरुष शिक्षक आहेत. शाळेचे मुख्याध्यापक वेणुगोपालन एच यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयाची कल्पना प्रथम पुरुष कर्मचारी सदस्याला आली.
"आमच्या स्टाफ सदस्यांपैकी एक असलेल्या संजीव कुमार व्ही. यांनी पुरुष शिक्षकांना 'सर' म्हणण्याची जुनी प्रथा संपवण्याची कल्पना मांडली. पलक्कड येथील सामाजिक कार्यकर्ते बोबन मट्टुमंथा यांनी सुरू केलेल्या अशाच मोहिमेतून त्यांना प्रेरणा मिळाली. सरकारी अधिकाऱ्यांना सर किंवा मॅडम म्हणून संबोधण्याची प्रथा बंद करण्यासाठी बोबन मट्टुमंथा यांनी सरकारशी संपर्क साधला होता. असेच बदल शाळांमध्येही व्हायला हवेत," असे मत मट्टुमंथा यांनी व्यक्त केले.
स्त्री-पुरुष समानता आणण्याचा प्रयत्न
"शाळेपासून दूर असलेल्या पंचायतीमध्येही असेच बदल केले जात आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये माथूर पंचायतीने सर आणि मॅडमची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रशासकीय मंडळाने पंचायत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदनामाने संबोधित करण्याचे निर्देश दिले होते. पंचायतीच्या निर्णयाचा शाळेवरही खूप परिणाम झाला आहे.
'शिक्षकांना संबोधित करताना लैंगिक समानता आणण्यासाठी आणि शाळेत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न का करू नयेत, असा विचार आम्ही केला. पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना, स्त्री आणि पुरुष दोघांनाही 'शिक्षक' म्हणून संबोधण्यास सांगितले आहे. सुरुवातीला या कारवाईला खूप विरोध झाला, पण हळूहळू विद्यार्थी शिक्षकांना 'शिक्षक' म्हणू लागले. आता कोणताही विद्यार्थी पुरुष शिक्षकाला सर किंवा स्त्रीला मॅडम म्हणत नाही," असे मुख्याध्यापकांनी सांगितले.
'सर' हा शब्द वसाहती काळाची आठवण करून देतो
'सर' आणि 'मॅडम' हे शब्द लैंगिक समानतेच्या विरोधात आहेत. शिक्षकांना त्यांच्या पदनामाने संबोधित केले पाहिजे, त्यांच्या लिंगानुसार नाही. शिक्षकांना संबोधित करण्याचा नवीन मार्ग विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक समानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल. 'सर' हा शब्द वसाहती काळाची आठवण करून देणारा आहे, त्यामुळे ही प्रथा बंद व्हायला हवी, असेही मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.