'एकांतात पॉर्न पाहणे ही अश्लीलता नाही...', हायकोर्टाची टिप्पणी

Kerala High Court: एकांतात पॉर्न पाहणे हा अश्लीलतेचा गुन्हा नाही.
Kerala High Court
Kerala High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Kerala High Court: एकांतात पॉर्न पाहणे हा अश्लीलतेचा गुन्हा नाही. या संदर्भात केरळ उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात एका व्यक्तीविरुद्ध सुरु केलेली फौजदारी कारवाई रद्द केली.

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.व्ही. कुन्हीकृष्णन म्हणाले की, केवळ पॉर्न व्हिडिओ पाहणे हा अश्लीलतेनुसार गुन्हा ठरत नाही.

न्यायालयाने म्हटले की, जर कोणी अश्लील व्हिडिओ 'प्रायव्हसीमध्ये'मध्ये पाहिला आणि तो इतर कोणाला पाठवला नाही किंवा तो सार्वजनिरित्या पाहत नसेल, तर तो आयपीसी अंतर्गत अश्लीलतेचा गुन्हा मानला जाणार नाही.

असा कंटेट पाहणे ही व्यक्तीची वैयक्तिक चॉइस आहे आणि न्यायालय त्याच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही.

Kerala High Court
Kerala High Court: "याचा अर्थ असा नाही की, आई मुलांसाठीही वाईट असते..." न्यायाधीशांचे दोनच शब्द अन् कोर्ट रुम स्तब्ध

लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, निकालाने स्पष्ट केले की, अश्लील व्हिडिओ इतरांना न दाखवता खाजगीरित्या पाहणे हा भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292 अंतर्गत अश्लीलतेचा गुन्हा ठरणार नाही.

न्यायालयाने म्हटले की, "या प्रकरणात प्रश्न असा आहे की, एखाद्या व्यक्तीने इतरांना न दाखवता पॉर्न व्हिडिओ पाहणे हा गुन्हा आहे का? न्यायालय तो गुन्हा असल्याचे घोषित करु शकत नाही.

कारण ही त्याची वैयक्तिक चॉइस आहे आणि त्यात हस्तक्षेप करणे म्हणजे त्याच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखे आहे."

न्यायालयाने पुढे सांगितले की, "एखाद्या व्यक्तीने त्याच्या प्रायव्हसीमध्ये अश्लील व्हिडिओ पाहणे हा आयपीसीच्या कलम 292 नुसार गुन्हा ठरत नाही.

त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ पाहणे हाही आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत गुन्हा ठरत नाही.

मात्र, आरोपीने (Accused) कोणतेही अश्लील व्हिडिओ किंवा फोटो सार्वजनिकपणे प्रसारित केले किंवा वितरित केले किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तो आयपीसीच्या कलम 292 अन्वये गुन्हा ठरेल.

आपल्या देशात एकांतात पुरुष आणि स्त्री यांच्यात सहमतीने लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही, असेही न्यायालयाने पुढे म्हटले.

Kerala High Court
Kerala High Court: 'बार कौन्सिलचे सदस्य एलएलबीचा अभ्यासक्रम ठरवतात, ही सर्वात मोठी शोकांतिका...', केरळ HC च्या न्यायाधीशांचं वक्तव्य

तथापि, न्यायमूर्ती कुन्हीकृष्णन यांनी पालकांना मुलांना मोबाईल फोन देण्याच्या धोक्याबद्दल सावध केले.

इंटरनेट (Internet) सुविधा असलेल्या मोबाईल फोनवर पॉर्न व्हिडिओ सहज उपलब्ध असून मुलांनी ते पाहिल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा न्यायालयाने दिला.

अशा प्रकारे न्यायालयाने पालकांना मुलांना माहितीपूर्ण बातम्या आणि त्यासंबंधी व्हिडीओ दाखवण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com