'या' कारणामुळे बंगळुरुमध्ये उद्या खाजगी शाळा राहणार बंद!

Cauvery Water Dispute: कर्नाटक आणि तामिळनाडूमधील कावेरी पाणी प्रश्न पुन्हा पेटला आहे. यातच आता, बंगळुरुमधील सर्व खाजगी शाळा उद्या बंद राहणार आहेत.
Schools
SchoolsDainik Gomantak
Published on
Updated on

Cauvery Water Dispute: बंगळुरुमधील सर्व खाजगी शाळा उद्या बंद राहणार आहेत. कर्नाटकातील इंग्लिश मीडियम स्कूल (KAMS) च्या असोसिएटेड मॅनेजमेंटने याबाबतची घोषणा केली आहे.

बंगळुरु शहरचे उपायुक्त दयानंद केए यांनीही पुष्टी केली की, बंगळुरु बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कर्नाटकात दोन बंद पुकारण्यात येणार आहेत – एक मंगळवारी बंगळुरुमध्ये आणि दुसरा शुक्रवारी राज्यभर. कावेरी नदीचे पाणी शेजारच्या तामिळनाडूला सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ हे बंद होत आहेत.

दरम्यान, कन्नड कार्यकर्ते नागराज यांच्या नेतृत्वाखाली ‘कन्नड ओक्कुटा’ या बॅनरखाली राज्यव्यापी बंद होणार आहे. मंगळवार, 26 सप्टेंबर रोजी बंगळुरु बंदची हाक शेतकरी नेते कुरुबुरु शांताकुमार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी दिली आहे.

Schools
Cauvery Water Dispute: 26 सप्टेंबरला बंगळुरू बंदची घोषणा, कावेरी मुद्द्यावरून पुन्हा संघर्ष

दुसरीकडे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सांगितले की, बंद हा शांततापूर्ण असावा, बंदमुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू नये.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, पुढच्या वेळी जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयासमोर येईल तेव्हा सरकार (Government) या मुद्द्यावर आपली बाजू मांडेल.

195 तालुक्यांमध्ये दुष्काळ

तामिळनाडूला (Tamil Nadu) पाणी सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत रविवारी मंड्यामध्ये विविध संघटनांनी बंद पाळला होता. कर्नाटक सरकारने राज्यात पाऊस नसल्याचं कारण देत कावेरीचं पाणी सोडण्यास असमर्थता व्यक्त केली होती.

सिद्धरामय्या यांनी ऑगस्टमध्ये राज्यात 73 टक्के कमी पाऊस झाल्याचे सांगितले होते. राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी 195 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अंतर्गत केंद्राकडून नुकसान भरपाई मागण्याचा प्रस्ताव मान्य केला.

पीक नुकसान सर्वेक्षणाच्या आधारे, राज्य सरकारने म्हटले होते की 161 तालुके गंभीर दुष्काळाचा सामना करत आहेत आणि 34 तालुके मध्यम दुष्काळाचा सामना करत आहेत.

Schools
Karnataka Govt Circular: मंदिरांना निधी देण्यावर बंदी घालणारे परिपत्रक अखेर मागे; कर्नाटक सरकारचा निर्णय

राज्यात आंदोलने सुरुच

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा म्हणाले की, पोलीस कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. म्हैसूर, मंड्या, चामराजनगर, रामनगरा, बंगळुरू आणि राज्याच्या इतर भागात कावेरी नदी खोऱ्यात शेतकरी संघटना आणि समर्थक कन्नड संघटनांनी निषेध व्यक्त करून संताप व्यक्त केला. आंदोलकांनी राज्य सरकारला शेजारच्या राज्याला पाणी न सोडण्याची विनंती केली आहे.

कर्नाटकचे म्हणणे आहे की, ते कावेरी नदी खोऱ्यातील उभ्या पिकांसाठी सिंचनाच्या पाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी सोडण्याच्या स्थितीत नाही कारण मान्सूनच्या कमी पावसामुळे पाण्याची कमतरता आहे. शुक्रवारी, चित्रदुर्ग, बल्लारी, दावणगेरे, कोप्पल आणि विजयपुरा यांसारख्या जिल्ह्यांमध्येही निदर्शने झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com