मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ (PM Pravind Jugnauth) आज रविवार 17 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीत त्यांच्यासोबत पत्नी कोबिता जगन्नाथ आणि एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील असणार आहे. (Prime Minister of Mauritius on an 8 day visit to India with his wife)
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रविंद कुमार 19 एप्रिल रोजी गुजरातमधील (Gujarat) जामनगर येथे WHO-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या पायाभरणी समारंभाला देखील उपस्थित राहणार आहेत.
20 एप्रिल रोजी गांधीनगर येथे होणाऱ्या ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन समिटमध्येही ते सहभागी होणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान वाराणसीलाही देखील भेट देणार आहेत.
गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी मॉरिशसचे कॅबिनेट सचिव एनके बल्लाह यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.