Russia-Ukraine War: युक्रेनची रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका

Russia-Ukraine War: रशियाने युद्धाच्या निमित्ताने निष्पाप नागरिकांचा नरसंहार केला : युक्रेन
president volodymyr zelensky
president volodymyr zelenskydainikgomantak
Published on
Updated on

Russia-Ukraine War News Update : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यात त्यांनी रशियाने युद्धाच्या निमित्ताने निष्पाप नागरिकांचा नरसंहार केल्याचा आरोप आहे. तसेच युक्रेनमध्ये रशियाला लष्करी कारवाई आणि शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावेत अशी मागणी केली आहे. रशियाविरोधातील याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होऊ शकते. (Ukraine approaches International Court of Justice against Russia)

president volodymyr zelensky
Russia-Ukraine War: युक्रेननं चर्चेचा प्रस्ताव फेटाळला
president volodymyr zelensky
Russia-Ukraine War: रशियन सैन्याचा युक्रेनच्या आणखी एका शहरावर ताबा

रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला. येथे खार्किवच्या रस्त्यांवर लढाई सुरू आहे. आज सकाळी युक्रेनने दावा केला की रशियन सैन्याने खार्किवमध्ये गॅस पाईपलाइनचा (gas) स्फोट केला. ज्यामुळे 'पर्यावरणाची हानी' होऊ शकते. स्फोटाच्या धुराने मशरूमच्या ढगासारखा अकार घेतला होता. शहरे आणि लष्करी तळांवर हवाई हल्ले (Air strikes) केल्यानंतरही लष्कर आता राजधानी कीवच्या जवळ आले आहे. तर रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिणेकडे असणाऱ्या नोव्हा काखोव्हाका या शहरावर रशियाने (Russia) ताबा मिळवला आहे.

त्याच वेळी, 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) अंतर्गत चौथे उड्डाण रोमानियाहून (Romania) निघाले आहे. यामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या 198 भारतीय नागरिकांना आणण्यात येत आहे. आतापर्यंत दोन उड्डाणे भारतात आली आहेत. आणि तिसरी उड्डाणे देखील बुडापेस्ट येथून निघाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com