Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

YouTube वर मोदींचा बोलबाला, पंतप्रधान मोदी 1 कोटी सबस्क्राइबर्ससह अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) YouTube सबस्क्राइबर्सच्या बाबतीत जागतिक नेत्यांमध्ये आघाडीवर आहेत. त्यांच्या सबस्क्राइबर्सच्या संख्येने 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) YouTube सबस्क्राइबर्सच्या बाबतीत जागतिक नेत्यांमध्ये आघाडीवर आहेत. त्यांच्या सबस्क्राइबर्सच्या संख्येने 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या यूट्यूबवर सबस्क्राइबर्सची संख्या 3.6 दशलक्ष आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या स्थानावर आहेत. यूट्यूबवर त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या 30.7 लाख आहे. इंडोनेशियाचे (Indonesia) राष्ट्रपती जोको विडोडो (Joko Widodo) यांचे YouTube वर 28.8 दशलक्ष सबस्क्राबर्सची संख्या आहे. (Prime Minister Narendra Modi Has Crossed The 1 Crore Mark In The Number Of Subscribers On YouTube)

दरम्यान, या यादीत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचाही समावेश आहे. यूट्यूबवर त्यांचे 19 लाख सबस्क्राइबर्स आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे यूट्यूबवर 7.03 लाख सबस्क्राईब आहेत.

Prime Minister Narendra Modi
जागतिक वारसा यादीत नामांकन म्हणून कर्नाटकातील 'हे' मंदिरे समाविष्ट

तसेच राष्ट्रीय स्तरावर यूट्यूब सब्सक्राइबर्समध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आघाडीवर आहेत. त्यांचे 5.25 लाख सबस्क्राईबर्स आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांचे 4.39 लाख सबस्क्राइबर्स आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचे YouTube वर 3.73 लाख सबस्क्राइबर्स आहेत.

शिवाय, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या यूट्यूबवरील सबस्क्राइबर्सची संख्या 2.12 लाख आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे यूट्यूबवर 1.37 लाख सबस्क्राइबर्स आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com