कर्णाटक राज्यातिल बेलूर, हलेबिड आणि सोमनाथपूरा येथिल होयसला मंदिराल ला 2022 – 2023 च्या जागतीक वारसा स्थळांचा दर्जा जाहीर करण्याबाबत चा अहवाल सादर केला. केंद्रीय संस्कृति मंत्रालय ने सोमवारी याबाबतीत माहीती दिली. होयसला येथील पवित्र स्मारकास 15 एप्रिल 2014 रोजी यूनेस्कोने संभाव्य सुचीमध्ये समीविष्ट केली होती. मानवाने बनविलेले हे एक भारताच्या समृध्द ऐतिहासीक वारसा ची ग्वाही देतात.Hoysala Mandir
UNESCO (Unesco)मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी यांनी सोमवारी औपचारिकपणे होयसला मंदिरांचे नामांकन जागतिक वारसा संचालक, लाझारे एलौंडौ यांच्याकडे सुपूर्द केले. जागतिक वारसा केंद्राकडे या संदर्भातील कागदपत्रे सादर केले आहे. ही पहिली पायरी आहे, त्यानंतर तांत्रिक तपासणी केली जाईल. एकदा सबमिशन केले की, युनेस्को मार्चच्या सुरुवातीस परत संवाद साधेल. त्यानंतर सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 मध्ये साइटचे मूल्यांकन केले जाईल आणि जुलै/ऑगस्ट 2023 मध्ये डॉसियरचा विचार केला जाईल. सध्दया भारतात 40 स्थळांना जागतिक स्थळांचा दर्जा जाहीर केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.