PM Modi: ''...दोषी कोणीही असो त्याला सोडलं जाणार नाही''; महिलांविरोधातील वाढत्या अत्याचारावर मोदींनी दिली तंबी!

PM Modi Marashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (25 ऑगस्ट) महाराष्ट्रातील जळगाव येथे आयोजित केलेल्या लखपती दीदी संमेलनात सहभागी होऊन जाहीर सभेला संबोधित केले.
PM Modi: ''...दोषी कोणीही असो त्याला सोडलं जाणार नाही''; महिलांविरोधात वाढत्या अत्याचारावर मोदींनी दिली तंबी!
PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (25 ऑगस्ट) महाराष्ट्रातील जळगाव येथे आयोजित केलेल्या लखपती दीदी संमेलनात सहभागी होऊन जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी देशभर संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''महिलांविरुद्ध गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आम्ही कायदा अधिक मजबूत आणि कठोर करत आहोत.''

गुन्हेगारांना सोडण्यात येवू नये. एवढचं नाहीतर त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही सोडता कामा नये, असेही ते जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, पोलिस विभाग, यातील जो कोणी गुन्हेगारी कृत्यात सहभागी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. सरकारे येत-जात राहतात. आमच्या सरकारचे प्राधान्य महिलांचे संरक्षण आहे. महिलांविरुद्ध गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.''

PM Modi: ''...दोषी कोणीही असो त्याला सोडलं जाणार नाही''; महिलांविरोधात वाढत्या अत्याचारावर मोदींनी दिली तंबी!
NIA Team Attack In West Bengal: बंगालमध्ये ईडीनंतर आता एनआयएच्या टीमवर हल्ला; हल्लेखोरांकडून आरोपीला नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न

महिलांवरील गुन्ह्यांबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''आज मी पुन्हा एकदा देशातील प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारांना सांगू इच्छितो की, महिलांवरील गुन्हे हे अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असो, त्याला सोडता कामा नये. अशा गुन्हेगारी प्रकरणात जो कोणी आरोपीला मदत करतो त्यालाही सोडता कामा नये. यात मग हॉस्पिटल असो, शाळा असो, कार्यालय असो की पोलीस यंत्रणा... कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा झाला तर संबंधितांना त्याची किम्मत चुकवावीच लागेल.''

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''महिलांविरुद्ध गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही कायदा अधिक मजबूत आणि कठोर करत आहोत. यापूर्वी, एफआयआर नोंदवल्या जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या, आता आम्ही बीएनएस आणले आणि त्यात अनेक सुधारणा केल्या. जर महिलेला पोलिस स्टेशनमध्ये जायचे नसेल तर ती ई-एफआयआर दाखल करु शकते. कोणीही ई-एफआयआरमध्ये छेडछाड करु शकत नाही. लग्नानंतर महिलांवरील गुन्ह्यांच्या तक्रारी येत होत्या, आम्ही बीएनएसमध्ये सुधारणा केल्या आहेत. महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सदैव पाठीशी आहे.''

PM Modi: ''...दोषी कोणीही असो त्याला सोडलं जाणार नाही''; महिलांविरोधात वाढत्या अत्याचारावर मोदींनी दिली तंबी!
West Bengal Crime: बंगालमध्ये 37 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून संपवले जीवन; नागरिकत्व दुरुस्ती कायदा झाल्यापासून...

आमच्या सरकारने महिलांसाठी खूप काम केले

पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, 'भारताच्या मातृशक्तीने समाज आणि राष्ट्राचे भविष्य घडवण्यात नेहमीच मोठे योगदान दिले आहे आणि आज जेव्हा आपला देश विकसित होण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे, तेव्हा आपली मातृशक्ती पुन्हा पुढे येत आहे.' पंतप्रधान मोदी शेवटी म्हणाले की, 'आज तुम्हीच मागील सरकारांची सात दशके आणि मोदी सरकारची 10 वर्षे याचे मूल्यमापन करा... मोदी सरकारने किती काम केले ते तुमच्या लक्षात येईल. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने एवढे काम केले नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com