'भ्रष्टाचाराच्या अत्तराचे श्रेय का घेतले नाही': PM Modi

यापूर्वी कानपूरमध्ये पीयूष जैन यांच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यांचाही मोदींनी रॅलीत उल्लेख करत अखिलेश यादव (akhilesh yadav) यांच्यावर निशाणा साधला.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

Dainiki Gomantak 

Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi in Kanpur) आज कानपूर दौऱ्यावर आहेत. कानपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी कानपूर मेट्रोला भेट दिली. यासोबत बीना-पंकी बहुउत्पादक पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटन देखील यावेळी पंतप्रधानांनी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi) निराला नगर रेल्वे मैदानावर एका जाहीर सभेलाही संबोधित केले, ज्यात त्यांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मागील सरकारांना घेरले.

यापूर्वी पीएम मोदींनी कानपूर मेट्रोनेही प्रवास केला होता. यामध्ये सीएम योगी आणि मंत्री हरदीप सिंग पुरी त्यांच्यासोबत होते. तत्पूर्वी, पंतप्रधान आयआयटीच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.

<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi</p></div>
आज पंतप्रधानांचा कानपूर दौरा, सभेला 91 हजार लाभार्थी राहणार उपस्थित

यापूर्वी कानपूरमध्ये पीयूष जैन यांच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यांचाही मोदींनी रॅलीत उल्लेख करत अखिलेश यादव (akhilesh yadav) यांच्यावर निशाणा साधला. पीएम म्हणाले की, 'हे लोक खोक्यातही नोटा मिळाल्या असल्याचे म्हणतील. आणि विशेष म्हणजे हे काम भाजपने केले असल्याचे देखील म्हणतील.' आधीच्या सरकारने ज्या भ्रष्टाचाराचे अत्तर शिंपडले होते ते आज सर्वांसमोर आले आहे. पण आता ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. त्याचे श्रेय का घेत नाहीत. सर्वांनी पाहिलेला नोटांचा डोंगर हे त्यांचे (एसपी) कर्तृत्व असल्याचे देखील मोदी म्हणाले.

आधीच्या सरकारांवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, आधीच्या सरकारांना वेळेची किंमत कळत नव्हती. त्यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये योजना वेळेवर पूर्ण झाल्याचा दावा मोदींनी केला. जाहीर सभेत पीएम मोदींनी कानपुरिया स्टाईल आणि ठग्गू के लाडूंचा उल्लेख केला.

पीएम मोदींसोबत कार्यक्रमात सहभागी झालेले सीएम योगी म्हणाले की, कानपूर मेट्रोमुळे लोकांना जॅमपासून सुटका मिळेल आणि कानपूरचे चित्र बदलेल. ते पुढे म्हणाले की, स्वार्थाच्या राजकारणामुळे कानपूरचे नुकसान झाले. त्यात उद्योग ठप्प झाल्यामुळे शहरात अराजकता पसरली आहे. मात्र आता तसे होणार नाही, असा दावा योगींनी केला. योगी पुढे म्हणाले की, यूपी हे देशातील पहिले राज्य आहे जिथे 5 शहरांमध्ये मेट्रो चालवली जाते.

<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi</p></div>
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सुरक्षा बल अन् नक्षलवाद्यांमधील चकमकीत 6 नक्षलवादी ठार

याआधी आयआयटी कानपूर येथे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज कानपूरसाठी दुहेरी आनंदाचा दिवस आहे, कारण आज कानपूरला मेट्रोसारख्या सुविधा मिळत आहेत. तर दुसरीकडे जगाला आयआयटी कानपूरकडून तुमच्यासारखी अनमोल भेट मिळाली आहे.

शिवाय, पीएम मोदींनी कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात केली आहे. आयआयटी कानपूर ते मोती झील हा संपूर्ण ९ किमी लांबीचा मार्ग आहे. यादरम्यान पंतप्रधान आयआयटी मेट्रो स्टेशनपासून गीता नगरपर्यंत मेट्रोनेच गेले. कानपूरमधील मेट्रो रेल्वे प्रकल्पाची संपूर्ण लांबी 32 किमी आहे आणि तो 11,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com