Rashtrapati Bhavan
Rashtrapati BhavanDainik Gomantak

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये या नावांची जोरदार चर्चा

देशात पुढील राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Published on

Presidential Election 2022: देशात पुढील राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 15 जूनपासून राष्ट्रपतीपदासाठी नामांकन प्रक्रिया सुरु झाली असून, ती 29 जूनपर्यंत चालणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी सरकार आणि विरोधकांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सध्या भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या प्रकरणावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (presidential election 2022 bjp finalizes 2 names for presidential election)

भाजपने ही दोन प्रमुख नावे निश्चित केली आहेत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने देशातील अंतर्गत परिस्थिती आणि परदेशातील संबंध लक्षात घेऊन दोन नावे तात्पुरत्या स्वरुपात निश्चित केली आहेत. यापैकी एक नाव म्हणजे केरळचे (Kerala) राज्यपाल आणि मुस्लिम नेते आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan). त्याच वेळी, दुसरे नाव झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मूचे सांगितले जात आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.

Rashtrapati Bhavan
Presidential Election: पहिल्याच दिवशी लालू प्रसाद यादवांचा उमेदवारी अर्ज 'रिजेक्ट'

आरिफ मोहम्मद खान हे निर्विवाद नेते राहिले आहेत

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते भाजपच्या विचारसरणीला आणि राजकारणाला साजेसे आहेत. सर्वप्रथम, ते मुस्लिमांच्या संयमी चेहऱ्याचे प्रतिनिधित्व करतात आणि कट्टरतावादाच्या विरोधात कठोरपणे बोलतात. शाहबानो प्रकरणातील कट्टरपंथी मुस्लिमांपुढे झुकल्याचा निषेध म्हणून त्यांनी राजीव गांधी सरकारचा राजीनामा दिला होता.

दुसरीकडे, आरिफ मोहम्मद खान हे उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध विद्वान आहेत. त्यांना देशाचे राजकारण, परदेशातील राजनैतिक संबंध आणि प्रमुख समस्यांचे सखोल ज्ञान आहे. ते आजवर निर्विवाद नेते राहिले असून त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहाराचा आरोप झालेला नाही. या गुणांमुळे आरिफ मोहम्मद खान यांचे समर्थक सर्वच पक्षांमध्ये आहेत. आरिफ मोहम्मद खान यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यास मुस्लिम देशांशीही संबंध दृढ होतील आणि मोदी सरकारविरोधात अपप्रचार करणाऱ्या कट्टरवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा पक्षाचा विचार आहे.

Rashtrapati Bhavan
Presidential Election: बैठकीपूर्वी ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल होत्या

झारखंडच्या (Jharkhand) माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचाही भाजपच्या यादीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या तात्पुरत्या निवडीमागे दोन मोठी कारणे सांगितली जात आहेत. पहिले, मोठे कारण म्हणजे आजवर देशात आदिवासी विभागातील कोणीही राष्ट्रपती झालेला नाही. तर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक राहतात.

देशात अद्याप आदिवासी राष्ट्रपती झालेला नाही

आदिवासी विभागातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्यास या राज्यांतील आदिवासी समाजात पक्षाचा पाठिंबा वाढेल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. ज्याचा थेट फायदा पक्षाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. दुसरे मोठे कारण म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, त्या सर्व राज्यांमध्ये भाजपला महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की, जर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून पुढे केले (राष्ट्रपती निवडणूक 2022), तर देशभरातील महिलांना मोठा संदेश दिला जाऊ शकतो. द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीमुळे आदिवासी आणि महिला असे दोन्ही फायदे भाजपला मिळणार आहेत. अशा स्थितीत त्यांच्या उमेदवारीचीही शक्यता प्रबळ आहे.

Rashtrapati Bhavan
Presidential Candidate: विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण? या नावांची चर्चा

PM मोदी घेऊ शकतात निर्णय

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकारणावर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, दोघेही अनेकदा चकित करणारे निर्णय घेतात. ज्या लोकांची नावे वेगवेगळ्या पदांसाठी माध्यमांमध्ये दिसतात ती अनेकदा वेगवेगळ्या नावांनी येतात. अशा परिस्थितीत आरिफ मोहम्मद खान आणि द्रौपदी मुर्मू यांच्याशिवाय तिसरे नाव अचानक फायनल होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीची सध्या सर्वांनाच प्रतीक्षा आहे. ज्यामध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा करुन अंतिम नाव निश्चित केले जाईल (Presidential Election 2022).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com