President Draupadi Murmu: विद्यार्थ्यांच्या हाती देशाचे भविष्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू : गोवा विद्यापीठात 34 वा दीक्षांत सोहळा उत्साहात
President Draupadi Murmu
President Draupadi MurmuDainik Gomantak
Published on
Updated on

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करण्यासोबतच येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे. आजचे विद्यार्थी, युवा उद्याचा विकसित भारत निर्माण करतील, समृद्ध राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करतील, असा विश्‍वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.

President Draupadi Murmu
Goa BJP : ...म्हणून भाजप गाभा समितीची बैठक तानावडे यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रपती गोवा विद्यापीठाच्या ३४व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी राज्यपाल तथा कुलपती पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० द्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. कौशल्य विकास, उद्योजकता तथा रोजगाराच्या अनुषंगाने प्राधान्य देण्यात येत आहे.

गोवा विद्यापीठात शिक्षण आणि संशोधनाचे एक अग्रणी केंद्र बनण्याची क्षमता अगोवा विद्यापीठातून पदवी घेणाऱ्यांमध्ये ५५ टक्के मुली असल्याचा आनंद आहे. त्यासोबतच सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थिनी आहेत. आपल्या आत्मविश्‍वास आणि योग्यतेच्या बळावर मुली पुढे जात असल्याचा मला अभिमान आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

President Draupadi Murmu
Goa Milk Price: दुधाला 100 टक्के आधारभूत किंमत द्या, दूध उत्पादकांची मागणी..

विद्यापीठावर स्तुतिसुमने

आजच्या युगात विद्यापीठाद्वारे तंत्रज्ञान व नवनिर्मितीला चालना दिली जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक योगदान तथा पर्यावरण संतुलन याबाबत संवेदनशील बनविले जात आहे. सल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

राष्ट्रपती उवाच...

गोवा विद्यापीठातून पदवी घेणाऱ्यांमध्ये 55 टक्के मुली असल्याचा तसेच सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्यांपैकी 60 टक्के मुली असल्याचा आनंद.

आजचे विद्यार्थी, युवा उद्याचा विकसित भारत निर्माण करतील, देशाचे समृद्ध राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करतील.

गोवा विद्यापीठात शिक्षण आणि संशोधनाचे एक अग्रणी केंद्र बनण्याची क्षमता.

नवीन शिक्षण धोरणात कौशल्य विकास, उद्योजकता तथा रोजगाराला प्राधान्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com