2024 मध्ये काँग्रेस जिंकणार 370 जागा, प्रशांत किशोर यांनी दिला प्लॅन

काँग्रेसने एकट्याने लढावे, युतीची गरज नाही; प्रशांत किशोर
prashant kishor will be join congress in upcoming days says party sources
prashant kishor will be join congress in upcoming days says party sources Dainik Gomantak
Published on
Updated on

शनिवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयासाठी 'प्लॅन 370' शेअर केला. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी पक्षप्रवेश करण्यास होकार दिल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी पक्षात कोणतेही पद मागितलेले नाही. दुसरीकडे, त्यांच्या सादरीकरणादरम्यान, त्यांनी पक्षाच्या नेत्यांशी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रत्येक टप्प्यावर चर्चा केली, ज्यावर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सहमती दर्शविली आहे. (prashant kishor will be join congress in upcoming days says party sources)

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांना पक्षात सल्लागार म्हणून सामील होण्याऐवजी पक्षात सामील होण्यास सांगण्यात आले, ज्याला पीके यांनी सहमती दर्शवली. मात्र, पीके काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आजपर्यंत त्यांनी पक्षात आपल्या पदासाठी कोणतीही मागणी केलेली नाही.

prashant kishor will be join congress in upcoming days says party sources
आर्मीत 10-12वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

पीकेंच्या सादरीकरणाने काँग्रेसला विजयाची आशा!

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर बॅकफूटवर धावणाऱ्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी हवी आहे. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या प्रवेशाचा काँग्रेस पक्ष बदल म्हणून विचार करत आहे. पीके पक्षात गेल्याने काँग्रेसला किती फायदा होईल, हा भविष्याचा मुद्दा आहे, मात्र शनिवारी त्यांनी आपल्या सादरीकरणाने सोनिया आणि राहुल गांधींना प्रभावित केले.

काँग्रेसने एकट्याने लढावे

आगामी लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये काँग्रेस पक्षाने 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे पीके यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले. यूपी, बिहार आणि ओडिशामध्ये काँग्रेसने (Congress) एकट्याने लढावे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात युती करून निवडणूक लढवणे अधिक योग्य ठरेल. प्रशांत किशोर यांचे म्हणणे राहुल गांधींनी मान्य केल्याचे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com