Viral Video: CM चे पोस्टर फाडले म्हणून भटक्या कुत्र्याविरोधात पोलिसांत तक्रार, जाणून घ्या प्रकरण

आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका भटक्या कुत्र्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, कुत्र्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे एका भिंतीवरील पोस्टर फाडले. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून, सोशल मिडियावर तो प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कुत्र्याने असेच एक पोस्टर फाडले. यानंतर महिला कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन पोलिसांकडे कुत्र्याची तक्रार केली. विरोधी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) च्या एका महिला कार्यकर्त्याने कुत्र्याविरोधात तक्रार केली आहे. दसरी उदयश्री असे या महिलेचे नाव आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी कुत्र्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उपरोधिक स्वरूपात केलेली ही तक्रार तेलुगु देसम समर्थक दासरी उदयश्री यांनी विजयवाडा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये कुत्रा पोस्टर फाडताना आणि भिंतीवरून ओढताना दिसत आहे.

Viral Video
Karnataka Assembly Election 2023: माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश, जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांचा हा अपमान असून कुत्र्याला भडकावणाऱ्या आणि आता व्हायरल व्हिडिओ क्लिप फिरवणाऱ्यांवर कारवाई करावी, असे उदयश्रीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. उदयश्री म्हणाल्या की, कुत्र्याने राज्यातील 6 कोटी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

आमच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला आणि त्यामागील लोकांना अटक करण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे केली आहे, असे त्या म्हणाल्या. टीडीपीच्या अनेक समर्थकांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा पोस्टर फाडताना आणि भिंतीवरून ओढताना दिसत आहे.

दरम्यान, “टीडीपी सदस्यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ केवळ मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी असून या तक्रारीला कोणताही आधार नाही. या संदर्भात कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही.” असे विजयवाडा पोलिसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com