World Women's Day: महिलांच्या सन्मानात पोस्ट खात्याकडून टपाल तिकिटे

भारतीय टपाल खात्याने आतापर्यंत अनेक महिलांच्या नावावर टपाल तिकिटे काढली आहेत.
Postal Tickets | words women's day News
Postal Tickets | words women's day NewsDainik Gomantak

पणजी: जागतिक महिला दिनानिमित्त जगभरातील महिलांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या दिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. महिलांचा सन्मान करण्यासाठी भारतीय टपाल खात्याने अनेक उपक्रम राबविले आहेत. खात्याने आतापर्यंत अनेक महिलांच्या नावावर टपाल तिकिटे काढली आहेत.

Postal Tickets | words women's day News
विशेष विमान, युक्रेनमधून 200 भारतीयांसह दिल्लीत दाखल

टपाल खात्याने स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या, राजकारणात आपली छाप सोडलेल्या, विज्ञानात नाव कामावलेल्या महिलांवर (Women) तिकिटे काढली आहेत. यामध्ये कलाकार व अन्य क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांचा देखील समावेश आहे. (Words women's day News Updates)

संत मीराबाई यांच्यावर टपाल तिकीट
स्वातंत्र्यानंतर टपाल खात्याने महिलांवर 150 पेक्षा अधिक विशेष टपाल आणि तिकिटे काढली आहेत. खात्याने 21 नोव्हेंबर 1948 रोजी संत मीराबाई यांच्यावर टपाल तिकीट काढले होते. स्वतंत्र भारताच्या (India) तिकिटावर पहिली महिला संत मीराबाई होत्या. महिलांना सैन्यात कायस्वरूपी कमिशन देण्यात आल्यावर 15 जानेवारी 2022 रोजी विशेष तिकीट काढण्यात आले.

Postal Tickets | words women's day News
Exit Polls 2022 : यूपीत भाजप; पण 'या' चार राज्यात कोणाची सत्ता येणार?

टपाल तिकीट नावावर असलेल्या काही महिला
राणी लक्ष्मीबाई, कमला नेहरू, समाजसेविका दुर्गाबाई देशमुख, गोंडवानाची राणी दुर्गावती, अरुणा असफ अली, मॅडम भिकाजी कामा, अहिल्याबाई होळकर, सुभद्रा कुमारीचौहान, सुभद्रा जोशी, विजयालक्ष्मी पंडित, सावित्रीबाई फुले, सावित्री देवी, कानन देवी, मीना कुमारी, नूतन, तेलगू अभिनेत्री सावित्री आदींवर तिकिटे काढली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com