दहशतवादी बनण्यासाठी निघालेल्या 14 तरुणांना थांबवण्यात पोलिसांना यश

हे युवक पाकिस्तान (Pakistan) गाठण्यासाठी सीमा ओलांडण्यापूर्वी पोलिसांना (Police) वेळेत या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी या वाटेतच पकडले.
Terrorist Representative Image
Terrorist Representative ImageDainik Gomantak
Published on
Updated on

काश्मीरला (Kashmir) पुन्हा नंदनवन बनवण्यासाठी जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) पोलिस आणि सैन्य (Police and Army) रात्रंदिवस काम करत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये बसलेल्या विविध दहशतवादी (Terrorist) संघटनांचे नेते खोऱ्यात आपली मुळे मजबूत करण्यासाठी सोशल मीडिया, आर्थिक प्रलोभन देऊन तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादीविरोधी कारवाईबरोबरच सुरक्षा दले दहशतवादी संघटनांच्या या कारवायांवरही सातत्याने नजर ठेवून आहेत. (Police succeed in stopping 14 youths who set out to become terrorists Anantnag)

अनंतनाग पोलिसांच्या अशाच एका मोहीमेला यश मिळाले आहे. अनंतनागच्या वेगवेगळ्या भागातील दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी पाकिस्तानला जाणार्‍या सुमारे 14 तरुणांना शोधुन पोलिसांनी त्यांच्या कुटूंबांच्या ताब्यात दिले आहे. हे युवक पाकिस्तान गाठण्यासाठी सीमा ओलांडण्यापूर्वी पोलिसांना वेळेत या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी या वाटेतच पकडले. गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणांचे समुपदेशन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र आता या तरुणांना ही जाणीव झाली आहे की, ते दहशतवादी बनल्यानंतर त्यांच्या कुटंबीयांना सांभाळणार कुणीही नाही.

Terrorist Representative Image
Monsoon Update: देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

खुद्द अनंतनाग पोलिसांनी खुलासा केला आहे की हे त्यांच्यासाठी मोठं यश आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी बाहेर आले नव्हते. सुमारे 18 ते 22 वर्षे वयोगटातील ही मुलं स्थानिक दहशतवादी संघटनांच्या सक्रिय सदस्यांशी संपर्कात होती. ते गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतवादाच्या मार्गावर चालत असताना त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत होते. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनीही या तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखविला, त्यानंतर ते तयार झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com