Monsoon Update: देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

देशातील अनेक राज्यांत सध्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Representative Image of Monsoon
Representative Image of MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या मान्सूनने (Monsoon) संपूर्ण देश व्यापला असून त्याचे जोरदार परिणाम आता उत्तर भारतात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) दिसून येत आहे. दिल्लीसह बर्‍याच राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या राज्यात ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशसह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Heavy rains are expected in many parts of the country)

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, कोकण आणि गोवा, कोस्टल कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. यासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, बिहार, झारखंड, विदर्भ, मराठवाडा, पूर्व राजस्थान आणि दक्षिण गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हरियाणा, तेलंगणा, सौराष्ट्र आणि कच्छ, पूर्व उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. कर्नाटक, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि राजस्थानच्या पश्चिम भागात देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Representative Image of Monsoon
Monsoon Session: दुसऱ्या दिवशीही संसदेचे कामकाज तहकूब

दरम्यान, हिमाचल प्रदेशच्या काही भागांसह उत्तराखंडमधील 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी एसडीआरएफने 19 जुलै ते 21 जुलै दरम्यान उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. हिमाचल प्रदेशातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल आहे. शिमल्यात गेल्या चोवीस तासांपासून सतत पाऊस पडत आहे. कांग्रा, बिलासपूर, मंडी आणि सिरमौर या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com