मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधीच्या काही तास आधी राजधानी लखनऊमध्ये एका बदमाशाची हत्या करण्यात आली आहे. राहुल सिंग असे या बदमाशाचे नाव असून लखनऊ पोलिसांनी (Police) त्याला हसनगंज भागात चकमकीत ठार केले आहे. राहुल सिंगवर अलीगंज ज्वेलर्स दरोडा प्रकरणाचा आरोप होता. या दरोड्यात त्याने एका कर्मचाऱ्याची हत्या केली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या राहुल सिंगला लखनऊ पोलिसांनी आज शुक्रवारी पहाटे 4 वाजता हसनगंज परिसरात घेरले. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अलीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बंधा रोडवर झालेल्या चकमकीत राहुल सिंग जखमी झाला. त्याना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला आहे.
राहुल सिंगने गेल्या वर्षी अलीगंज येथील एका ज्वेलरी दुकानावर भरदिवसा दरोडा टाकला होता. राहुलकडून ज्वेलरी शोरूममधून लुटलेले दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्याकडून पोलिसांना पिस्तूल आणि अनेक काडतुसे सापडली आहेत. सध्या राहुल सिंगचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात योगी सरकार परतल्यानंतर गुन्हेगारांवर कारवाई सुरू झाली आहे. राहुल सिंग हा दुसरा बदमाश आहे, जो योगी सरकार 2.0 मध्ये दुसऱ्यांदा मारला गेला आहे. यापूर्वी वाराणसीमध्ये 2 लाखांचे बक्षीस असलेला गुन्हेगार मनीष सिंग उर्फ सोनू सिंग याला पोलिसांनी मारले होते. त्याच्यावर डझनभर गुन्हे दाखल होते.
21 मार्च रोजी वाराणसीच्या लोहटा पोलीस स्टेशन हद्दीतील रिंग रोडजवळ, यूपी एसटीएफने दोन लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या बदमाश मनीष सिंग उर्फ सोनू सिंगला चकमकीत ठार केले होते. सोनू सिंग गेल्या 10 वर्षांपासून लोकांसाठी त्रासदायक ठरला होता. सोनू सिंगवर खून आणि दरोड्याच्या गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. आणि त्याला वाँटेड घोषीत करण्यात आले होते. त्याच्यावर 30 हून अधिक गुन्हे दाखल होते.
युपीतील लोकांसाठी अडचणीचा ठरलेल्या सोनू सिंगच्या एन्काउंटरनंतर लोकांनी जल्लोष केला. यावेळी उपस्थित लोकांनी बुलडोझर बाबा जिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या. योगी सरकार परतल्यानंतर आतापर्यंत दोन चकमकीत हल्लेखोर मारले गेले आहेत, तर अनेक चकमकीत बदमाशांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. तसंच अनेक बदमाश आत्मसमर्पण करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.