योगींच्या शपथविधीला उद्योगपती मुकेश अंबानी राहणार उपस्थित

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधीला सोहळ्याला भव्य स्वरुप देण्यासाठी भाजपकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधीला सोहळ्याला भव्य स्वरुप देण्यासाठी भाजपकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. योगी 2.0 च्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहे. यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर अनेक उद्योगपती आणि सिनेतारकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. (Businessman Mukesh Ambani will be present at the swearing in ceremony of Yogi Adityanath)

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi), काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, सपा नेते मुलायमसिंह यादव आणि इतर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

Yogi Adityanath
योगींच्या शपथविधी सोहळ्याला 'द काश्मीर फाइल्स' ची टीम लावणार हजेरी

याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani), गौतम अदानी (Gautam Adani), आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक मोठ्या उद्योगपतींनाही शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

तसेच, उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेले सुमारे ४५ हजार भाजप कार्यकर्ते या शपथविधीचे साक्षीदार होणार आहेत. पक्षाचे प्रवक्ते आणि इतर राज्यातील कार्यकर्तेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजप नेते जेपीएस राठोड म्हणाले की, 'संघटनेतून सरकारमध्ये प्रवेश करणाऱ्या सदस्यांबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाचा असणार आहे.'

Yogi Adityanath
'द काश्मीर फाइल्स' वरून गुलाम नबी आझाद यांची पाकिस्तानवर टीका

लखनऊ भगवेमय झाले

लखनऊमध्ये प्रत्येक चौकात स्वागत पोस्टर आणि भगवे झंडे लावण्यात आले आहेत. यादरम्यान योगी सरकारच्या एक्स्प्रेस वे, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय यांसारख्या योजनांचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. आम्ही प्रतिज्ञा करुन नवीन भारताचा नवा उत्तर प्रदेश बनवू, असा नारा देखील लिहण्यात आला आहे.

शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेत्यांचे कटआउट्स लावण्यात आले आहेत. योगी सरकारच्या योजनांचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. प्रत्येक चौकात भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com