राजस्थान निवडणुकीपूर्वी कॅश, ड्रग्ज अन् दारु जप्त; तपास यंत्रणांची मोठी कारवाई!

Rajasthan Assembly Elections: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस आणि इतर यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात रोकड, दारु आणि ड्रग्ज जप्त केले आहेत.
Cash
CashDainik Gomantak

Rajasthan Assembly Elections: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस आणि इतर यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात रोकड, दारु आणि ड्रग्ज जप्त केले आहे.

अमली पदार्थ, रोख रक्कम, दारु आणि 125 कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू इतर राज्याच्या सीमेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागात जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरातील ही मोठी कारवाई असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात 30 टक्के माल जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 1 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आयोगाने इतर राज्यांमधून आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून दारु, रोख रक्कम, मोफत भेटवस्तू आणि ड्रग्जचा पुरवठा रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

Cash
MP Assembly Election: भाजपकडून पहिला डाव! निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वीच तिकीट वाटप सुरू

आयुक्त म्हणाले की, 'या प्रकरणी आमची झीरो टॉलरन्स पॉलिसी आहे. निवडणुकीदरम्यान संभाव्य भागात 251 सीमा पोलीस चौक्या, 42 उत्पादन शुल्क विभागाच्या चौक्या, 64 वन चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत. त्यांनी पुढे असेही सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) बेकायदेशीर निधी हस्तांतरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) म्हणण्यानुसार, राज्य पोलीस, उत्पादन शुल्क विभाग, आयकर विभाग, बीएसएफ इत्यादींनी 28 ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान 64.3 कोटी रुपयांचे ड्रग्ज, 9.72 कोटी रुपयांची रोकड, 14.93 कोटी रुपयांची दारु आणि 12.93 कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू जप्त केल्या आहेत.

दरम्यान, गेल्या आठवडाभरात सुमारे 2.36 कोटी रुपयांची रोकड, 4.76 कोटी रुपयांची दारु, 20.33 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि 6.71 कोटी रुपयांचा मोफत वितरणाचा माल जप्त करण्यात आला होता.

Cash
MP Assembly Election: कर्नाटक विजयानंतर मिशन MP, 150 जागा जिंकणार कॉंग्रेस; राहुल गांधींचा मोठा दावा

जयपूरचे महानिरीक्षक उमेश दत्ता यांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, पंजाबमधून (Punjab) आणले जात असताना सुमारे 55 लाख रुपये किमतीची सुमारे 425 दारु जप्त करण्यात आली आहे. ती 31 ऑक्टोबर रोजी ट्रकने आणली जात होती. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, कोटाने 5 ऑक्टोबर रोजी झालावाडच्या कायसारा वनक्षेत्रातून 843 ग्रॅम डोडा पावडर जप्त केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com